ETV Bharat / state

व्यंगचित्राच्या माध्यमातून बच्चू कडूंचा भाजपवर 'प्रहार' - रावसाहेब दानवे

काही महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना शेतकरी साले असे संबोधले होते. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी दानवे यांच्या गावी मोर्चा ही काढला होता. आताही दानवे यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे.

व्यंगचित्राच्या माध्यमातून बच्चू कडूंचा 'प्रहार'; भाजप सरकारच्या घोषणारुपी रावणाचे दहन
author img

By

Published : Oct 8, 2019, 9:48 PM IST

अमरावती - अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे नेहमीच आपल्या अनोख्या आंदोलनांसाठी चर्चेत असतात. दसऱ्याला रावण दहन करण्याची परंपरा आहे. याच संधीचा फायदा साधत बच्चू कडूंनी भाजप सरकारच्या धोरणांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले आहे.

व्यंगचित्राच्या माध्यमातून बच्चू कडूंचा 'प्रहार'; भाजप सरकारच्या घोषणारुपी रावणाचे दहन

हेही वाचा - कोल्हापुरात सायंकाळी पार पडणार शाही दसरा सोहळा; हजारो नागरिक राहणार उपस्थित

काँग्रेस आघाडी असो की भाजपचे युती सरकार असो यांच्या धोरणावर सातत्याने बोट ठेऊन अनोखे आंदोलन करणारे आमदार बच्चू कडू हे नेहमी चर्चेत असतात. बेरोजगारी, फसवी मेगाभरती, शेत मालाला हमी भाव, कर्जमाफी, आर्थिक मंदी, फसवे सरकार या भाजप सरकारच्या घोषणांचे रावणरुपी व्यंगचित्र त्यांच्या कार्यकर्त्याने तयार केले आहे.

हेही वाचा - तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा, 108 साड्या गुंडाळून पालखी काढल्यानंतर तुळजाभवानी निद्रित

काही महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना शेतकरी साले असे संबोधले होते. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी दानवे यांच्या गावी मोर्चा ही काढला होता. आताही दानवे यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून टिका करण्यात आली आहे.

हेही वाचा - भोपाळमध्ये उभारले रावणाचे 'वॉटरप्रूफ' पुतळे...

हे व्यंगचित्र समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून यात बच्चू कडू धनुष्यबाण धरून भाजप सरकारच्या घोषणारुपी रावणाला बाण मारताना दिसत आहे. बच्चू कडूंनी या माध्यमातून सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले आहे. बच्चू कडू हे नेहमीच सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आक्रमकतेने आंदोलन करत असतात.

Intro:सरकारच्या घोषणांचे आ बच्चू कडू यांनी केले कार्टुनच्या माध्यमातून "दहण"

खा रावसाहेब दानवेंच्या बेताल वक्तव्याचा समावेश.
--------------------------------------------
अमरावती अँकर
काँग्रेस सरकार असो की मग भाजपा सरकार यांच्या धोरणावर सातत्याने बोट ठेऊन अनोखे आंदोलन करणारे आमदार बच्चू कडू हे नेहमी चर्चेत राहतात. दसऱ्याच्या पर्वावर रावणाचे दहन करण्याची परंपरा आहे.त्याच पार्श्वभूमीवर आ बच्चू कडू यांनी दसऱ्याची संधी साधून पुन्हा एकदा भाजप सरकारच्या धोरणावर बोट ठेवत कार्टुनच्या माध्यमातून सरकारच्या घोषणानाचे दहन केले आहे..

कार्टूनच्या माध्यमातून बेरोजगारी ,फसवी मेघाभरती, , शेतमालाला हमी भाव, कर्जमाफी, आर्थिक मंदी, फसवे सरकार अश्या प्रकारे संदेश लिहण्यात आले.काही महिन्या पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतांना खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना शेतकरी साले असे संबोधले होते.यावेळी आमदार बच्चू कडू यांनी दानवे यांच्या गावी मोर्चा ही काढला होता.दरम्यान आताही खासदार रावसाहेब दानवे यांच्या वर कार्टुनच्या माध्यमातून टिका करण्यात आली.

आ बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्याने तयार केलेले हे कार्टुन समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. यात बच्चू कडू धनुष्यबाण धरून बाण मारतांना दिसून येत आहे. तर यात दहा तोंडी रावत दिसत आहे.यावर सदर घोष वाक्य लिहण्यात आले आहे. बच्चू कडू या माध्यमातून सरकारला धारेवर धरले आहे. बच्चू कडू हे नेहमीच आक्रमक व सरकार विरोधात आंदोलन करीत असतात.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.