अमरावती - ग्रामीण क्षेत्राचा शाश्वत विकास होण्यासाठी ग्रामस्तरावर कौशल्ययुक्त प्रक्रिया उद्योगाची उभारणी आवश्यक आहे. गावात निर्माण होणाऱ्या दुग्ध उत्पादनांवर त्याचठिकाणी प्रक्रिया करुन बाजारातील मागणीनुसार उच्चतम कृषीमालाचा अखंडीत पुरवठा केला तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चित वाढ होऊ शकते. या उत्पादनांना विपणन व्यवस्थेची जोड देऊन ‘विकेल ते पिकेल’ या उक्तीप्रमाणे शेती व्यवसायाची वाटचाल आजच्या काळाची गरज आहे, असे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू म्हणाले.
बच्चू कडू यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन -
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विस्तार शिक्षण संचालनालय, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग तथा कृषी संशोधन केंद्र, अचलपूर याच्या संयुक्त विद्यमाने अचलपूर येथे आयोजित "स्वच्छ दुग्धत्पादन तंत्र तथा दुग्धपदार्थ निर्मिती" विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे तथा विद्यापीठांतर्गत 'माळी प्रशिक्षण केंद्राचे" उद्घाटन राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामस्तरीय प्रक्रिया उद्योगासह विपणन व्यवस्थेचे बळकटीकरण गरजेचे - बच्चू कडू - rural devlopment
विपणन व्यवस्थेची जोड देऊन ‘विकेल ते पिकेल’ या उक्तीप्रमाणे शेती व्यवसायाची वाटचाल आजच्या काळाची गरज आहे, असे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू म्हणाले.