ETV Bharat / state

आमदार बच्चू कडू यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क - maharastra assembly polls

आमदार बच्चू कडू यांनी बेलोरा येथील मतदान केंद्रावर आई व पत्नीसह मतदान केले. यावेळी लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी केले.

आमदार बच्चू कडू यांनी बजावला मतदानाचा हक्क
author img

By

Published : Oct 21, 2019, 12:11 PM IST

अमरावती - प्रहार संघटनेचे अध्यक्ष व अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या गावी बेलोरा येथील मतदान केंद्रावर आई व पत्नी सह त्यांनी मतदान केले. यावेळी लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी केले.

आमदार बच्चू कडू यांनी बजावला मतदानाचा हक्क

हेही वाचा- विरोधी पक्ष दिसतच नाही, निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेचे वर्चस्व - पियूष गोयल

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

Intro:
आमदार बच्चू कडू यांनी केले मतदान

अमरावती अँकर

प्रहार संघटनेचे अध्यक्ष व अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांनी आज आपल्या गावी बेलोरा येथील मतदान केंद्रावर आई व पत्नी सह मतदान केले
यावेळी लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी केले.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.