अमरावती : ऐन दिवाळीच्या पर्वावर माझी राज्यमंत्री तथा अचलपूरचे आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu ) आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यात जुंपली आहे. आपल्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करीत बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून राजापेठ पोलीस ठाण्यात आमदार रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल ( Complaint lodged at Rajapet Police Station ) करण्यात आला आहे. ( Police Complaint Against Mla Ravi Rana )
किराणा वाटपावर बच्चू कडू यांनी केली टीका : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात एक लाख गरीब कुटुंबांना दिवाळीच्या पर्वावर किराणा वाटप करण्यात आला. दरम्यान आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू चे मूळ गाव असणाऱ्या बेलोरा या गावात जाऊन किराणा वाटला. आमदार रवी राणा यांच्या किराणा वाटपावर बच्चू कडू यांनी टीका केली असतांना बच्चू कडूच्या गावात किराणा वाटप करून बच्चू कडून विरोधात आमदार रवी राणा यांनी मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही बच्चू कडू जे कोणते आंदोलन करतात त्याच्या मागे पैशांची थोडी करणे हाच उद्देश असतो असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी बच्चू कडून विरोधात केले होते.
जिल्ह्यात रंगला दोन आमदारांचा वाद : ऐन दिवाळीत आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद जिल्ह्यात रंगला आहे. हे दोन्ही आमदारांचा राज्यात सत्तेवर असणाऱ्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा आहे. मंत्रिपद मिळावे म्हणून या दोन्ही आमदारांमध्ये चुरस होती मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाल्याने मध्यंतरी या दोन्ही आमदारांमधील वाद काहीसा शमला असताना आता पुन्हा हे दोन्ही आमदार आमने सामने उभे ठाकले आहे.