ETV Bharat / state

व्यापाऱ्याला घडले माणुसकीचे दर्शन... रिक्षावाल्याने पैशांची बॅग केली परत - auto driver forgotten bag of traveler

अमरावती शहरातील मसानगंज परिसरात उमेश गुप्ता यांचं छोटं गिफ्ट सेंटर आहे. याच व्यवसायातून त्यांनी पै-पै गोळा करून गाडी घेण्याचं स्वप्न पाहिलं. त्यातूनच नागपूरमध्ये गाडीचा व्यवहार झाला होता. यासाठी उमेश गुप्ता नातेवाईकांसह नागपूरला गेले.

auto drivers in nagpur
रिक्षा चालकाने एका प्रवाश्याची विसरलेली बॅग परत केली. त्यात पाच लाख रुपये होते.
author img

By

Published : Oct 17, 2020, 12:56 PM IST

अमरावती - मसानगंजमध्ये वास्तव्यास असलेला एक छोटा व्यवसायिक गाडी खरेदी करण्यासाठी नागपुरात गेला. यावेळी त्याने सोबत पाच लाख रुपयांची बॅग घेतली होती. या व्यावसायिकाने एका रिक्षातून प्रवास केला. यादरम्यान, त्यांच्याकडून पैशांची बॅग रिक्षातच विसरली. याचसोबत बॅगमध्ये सही केलेला कोरा धनादेश देखील होता. मात्र रिक्षाचालकाने हे सर्व परत करून माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे.

रिक्षाचालकाने एका प्रवाशाची बॅग केली परत
अमरावती शहरातील मसानगंज परिसरात उमेश गुप्ता यांचं छोटं गिफ्ट सेंटर आहे. याच व्यवसायातून त्यांनी पै-पै गोळा करून गाडी घेण्याचं स्वप्न पाहिलं. त्यातूनच नागपूरमध्ये गाडीचा व्यवहार झाला होता. यासाठी उमेश गुप्ता नाकेवाईकांसह नागपूरला गेले. यावेळी त्यांनी रिक्षातून प्रवास केला. ठरलेल्या पत्त्यावर उमेश त्यांच्या नातेवाईकांसह पोहोचले.

काही वेळातच आपण पैशांची बॅग रिक्षातच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच या बॅगमध्ये एक सही केलेला कोरा धनादेश देखील होता. हे लक्षात येताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली.

नागपुरातील टायगर ऑटो संघटनेत रिक्षा चालवणारा अब्दुल खान याच्या ही बाब लक्षात येताच त्याने ती बॅग परत आणून दिली. त्यानंतर उमेश गुप्ता यांनी रिक्षा चालकाला बक्षीस स्वरुपात पैसे दिले. मात्र, अब्दुलने ते नाकारले. अब्दुलने दाखवलेल्या माणुसकीबद्दल त्याचा नागपूर जिल्हा प्रशासनाने शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.