ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांनी बडनेऱ्यात सभा घेऊन माझ्या विरोधात बोलून दाखवावे - आमदार रवी राणा

बडनेरा विधानसभा मतदारसंघात माझ्याविरुद्ध निवडणूक रिंगणात असणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा बडनेऱ्यात लावून दाखवावी आणि मुख्यमंत्र्यांना माझ्याविरोधात बोलायला सांगावे. जर मुख्यमंत्री माझ्या विरोधात एक शब्दही बोलले, तर मी म्हणाल ते हरायला तयार आहे, असे वक्तव्य बडनेरा मतदार संघाचे आमदार आणि अपक्ष उमेदवार रवी राणा यांनी आज जाहीर सभेत केले.

रवी राणा
author img

By

Published : Oct 5, 2019, 9:45 AM IST

अमरावती- बडनेरा विधानसभा मतदारसंघात माझ्याविरुद्ध निवडणूक रिंगणात असणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा बडनेऱ्यात लावून दाखवावी आणि मुख्यमंत्र्यांना माझ्याविरोधात बोलायला सांगावे. जर मुख्यमंत्री माझ्या विरोधात एक शब्दही बोलले, तर मी म्हणाल ते हरायला तयार आहे, असे वक्तव्य बडनेरा मतदार संघाचे आमदार आणि अपक्ष उमेदवार रवी राणा यांनी आज जाहीर सभेला संबोधित करताना केले.

जाहीर सभेला संबोधन करताना आमदार रवी राणा

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत रवी राणा यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांसह भाजप कार्यकर्त्यांवर कडाडून टीका केली. राजापेठ चौक येथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया समर्थीत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रवी राणा यांनी जाहीर सभेला संबोधित केले .

रवी राणा म्हणाले, आम्ही दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधानांनी आम्हाला भेटायला बोलावले होते. ४५ मिनिटांच्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची गरज असल्याचे म्हटले. मात्र मी कोणत्याही पक्षात जाऊन कोणत्याही नेत्याची गुलामगिरी करणारा नाही. बडनेरा मतदार संघात अनेक टीन टप्पर वाजत आहेत. यापैकी एकाने जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेऊन साधा फोटो जरी काढून आणला तर म्हणाल ते हरण्याची माझी तयारी आहे, असेही रवी राणा म्हणाले.

हेही वाचा- बच्चू कडू यांनी रक्तदान करून दाखल केला उमेदवारी अर्ज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडनेरा मतदार संघाचे चार वेळा सर्वेक्षन केले होता. आणि या सर्वेक्षनामध्ये मी पुन्हा एकदा आमदार होणार आहे असे लक्षात आल्यावर त्यांनी बडनेरा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार द्यायचा नसल्याचे ठरवले. येणाऱ्या मंत्री मंडळात मी कॅबिनेट मंत्री राहणार आहे. जर मी कॅबिनेट मंत्री झालो नाही तर पुढे निवडणूकच लढणार नाही, असेही आमदार रवी राणा म्हणाले. अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे पूर्णवेळ जरी बडनेऱ्यात राहिले, तरी शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ शकणार नाही. माझा विजय हा राज्यातील सर्वात मोठा विजय राहणार असल्याचेही रवी राणा यावेळी म्हणाले.

हेही वाचा- ...म्हणून आक्रमक असलेल्या आमदार यशोमती ठाकूर गहिवरल्या

सभेत खासदार नवनीत राणा, माजी लेडी गव्हर्नर कमल गवई, श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रमुख पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री वसुधा देशमुख, शरद तसरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Intro:बडनेरा विधानसभा मतदारसंघात माझ्याविरुद्ध निवडणूक रिंगणात असणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा बडनेरा लावून दाखवावी आणि मुख्यमंत्र्यांना माझ्याविरोधात बोलायला सांगावे. जर मुख्यमंत्री माझ्या विरोधात एक शब्द जरी बोलले तरी मी म्हणाल ते हरायला तयार आहे, असे वक्तव्य बडनेरा मतदार संघाचे आमदार आणि अपक्ष उमेदवार रवी राणा यांनी आज जाहीर सभेला संबोधित करताना केले. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित जाहीर सभेत रवी राणा यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांसह भाजप कार्यकर्त्यांवर कडाडून टीका केली.

Body:राजापेठ चौक येथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया समर्थीत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रवी राणा यांनी जाहीर सभेला संबोधित केले .यावेळी खासदार नवनीत राणा माझी लेडी गव्हर्नर कमल गवई, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रमुख पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याआणि माजी मंत्री वसुधा देशमुख, शरद तसरे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
रवी राणा म्हणाले, आम्ही दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधानांनी आम्हाला भेटायला बोलावले होते. 45 मिनिटांच्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची गरज असल्याचे म्हंटले. मात्र मी कोणत्याही पक्षात जाऊन कोणत्याही नेत्याची गुलामगिरी करणारा नाही. बडनेरा मतदार संघात अनेक टीन टप्पर वाजत आहेत. यापैकी एकाने तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेऊन साधा फोटो जरी काढून आणला तर म्हणाल ते हरण्याची माझी तयारी आहे आहे असेही रवी राणा म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडनेरा मतदार संघाचा चार वेळा सर्वे केला आणि या सर्वे मध्ये मी पुन्हा एकदा आमदार होणार आहे लक्षात आल्यावर त्यांनी बडनेरा मतदार संघातून भाजपचा उमेदवार द्यायचा नाही असे ठरवले. येणाऱ्या मंत्रिमंडळात मी मी कॅबिनेट मंत्री राहणार आहे जर मी कॅबिनेट मंत्री झालो नाही तर पुढे निवडणूकच लढणार नाही असेही आमदार रवी राणा म्हणाले अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे पूर्ण वेळ जरी बडनेरा राहिले तरी शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ शकणार नाही माझा विजय हा राज्यातील सर्वात मोठा विजय राहणार असल्याचेही ही रवी राणा यावेळी म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.