ETV Bharat / state

Asaduddin Owaisi : फडणवीस साहेब तुम्हीसुद्धा स्थलांतरित आहात- असदुद्दीन ओवैसी

अमरावतीच्या सभेत बोलताना एमआयएम पार्टीचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. फडणवीसांच्या विधानावरुन ओवेसींनी लोकमान्य टिळकांचा दाखला दिला.

असदुद्दीन ओवेसींची फडणवीसांवर टीका
असदुद्दीन ओवेसींची फडणवीसांवर टीका
author img

By

Published : Jun 26, 2023, 11:10 AM IST

असदुद्दीन ओवेसींची फडणवीसांवर टीका

अमरावती: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला औरंगजेबाची औलाद म्हणतात. तुम्ही विदेशी आहेत, असे म्हणतात. परंतु तुम्ही तरी इथले खरे रहिवाशी आहेत का? असा प्रति प्रश्न ओवेसी यांनी फडणवीस यांना केला. अमरावतीतील सभेत ते बोलत होते. भारतात राहणाऱ्या 130 कोटी लोकसंख्येपैकी सर्वच लोक 65 हजार वर्षांपूर्वी बाहेरून आले आहेत. त्यापैकी काही आफ्रिका, इराण, पूर्व आशिया आणि मध्य आशियामधून आले होते. आदिवासी मुळात भारतीय आहेत. जे इथले खरे रहिवाशी आहेत, असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

कोण खोटं बोलत आहे : अमरावतीच्या सभेत बोलताना एमआयएम पार्टीचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर प्रखर टीका केली. सध्या राज्यात चालू असलेल्या कारभारावरही त्यांनी सडकून टीका केली. ओवैसी यांनी यावेळी फडणवीसांवर खूप आगपाखड केली.राज्यात औरंगजेबचा वाद चालू आहे, त्यावर टीका करताना उपमुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना औरंगजेबाची औलाद अशा टीकास्त्र डागत असतात. फडणवीसांच्या या टीकास्त्रावर असदुद्दीन ओवेसींनी अमरावतीमधून जोरदार उत्तर दिले. लोकमान्य टिळकांच्या शब्दांचा दाखला देत ओवेसी म्हणाले की, टिळक म्हणाले होते की, ब्राह्मण हे आर्टिकमधून आले आहेत. हे प्रमाण मानल्यास एकतर फडणवीस खोटे बोलत आहेत किंवा लोकमान्य टिळक. भारतातील मूळ लोक असतील तर ते आदिवासी आहेत, बाकी सर्व स्थलांतरित झाले आहेत. लुकमान सलमान अन्सारी आणि अब्दुल मजीद अन्सारी या दोघांनाही बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. मात्र यावर राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस किंवा गृहमंत्री फडणवीस काहीही बोलले नाहीत. पुढे बोलताना ओवेसी म्हणाले की, या पक्षांना आमच्या जीवापेक्षा आमच्या मतांवर जास्त प्रेम आहे.

मोदींवर निशाणा : अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही खासदार राणा यांना मतदान केले. मात्र दिल्लीत पोहोचताच त्यांनी आपले रंग दाखवून मोदींची बाजू घेण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, आमचे पंतप्रधान इजिप्तमध्ये जाऊन तिथल्या मशिदीमध्ये जातात. परंतु भारतातल्या मशिदमध्ये मात्र कधीच येत नाही. माझे तुम्हाला आवाहन आहे की, चला आपण वाराणसीच्या मशीदमध्ये जाऊया. परंतु मला माहित आहेत ते माझ्यासोबत येणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

अर्थमंत्र्यांवर टीका : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधत त्यांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या अल्पसंख्याकांच्या बजेटमध्ये 40% कपात केली आहे. एवढेच नाही तर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीवरही मर्यादा घातल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्यावर टीका करताना ओवेसी म्हणाले, बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना तुमच्या सरकारने सोडले. स्त्रीची व्यथा फक्त स्त्रीच समजू शकते. परंतु तरीही या प्रकरणी त्या काहीही बोलल्या नाहीत.

सभेत बसलेल्या तरुणांना आवाहन करत ओवेसींनी त्याला सल्ला दिला. नशा करण्यापासून दूर राहा. व्यसन तुमचा नाश करेल. नशा करायची असेल तर चांगल्या गोष्टींची नशा करा. श्रद्धेची नशा स्वतःमध्ये निर्माण करा. - असदुद्दीन ओवेसी

वृत्त वाहिनीवर खटला भरणार : खोट्या बातम्या दिल्याप्रकरणी ओवेसी वृत्त वाहिन्यावर खटला दाखल करणार आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी काही वृत्तवाहिन्यांवर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सभेत मुघल सम्राट औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप केला. ओवेसी यांनी या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर खटला दाखल करण्याची धमकी दिली . 'फेक न्यूज' प्रसारित करणे. ते म्हणाले, मलकापूर येथील रॅलीत पोलीस उपस्थित होते. तुम्ही खोट्या बातम्या प्रसारित करत आहात. तुम्ही मुस्लिमांचा किती द्वेष कराल? मी तुमच्यावर खटले दाखल करेन.

हेही वाचा -

  1. Aurangzebs row : असदुद्दीन ओवैसींच्या भाषणादरम्यान औरंगजेबच्या घोषणा? पोलीस करणार तपास
  2. MP Asaduddin Owaisi : ठाकरे गट आणि एमआयएममध्ये युती होण्याची शक्यता नाही - असदुद्दीन ओवेसी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.