ETV Bharat / state

संत्र्याला चार हजार रुपये प्रतिहेक्टर प्रीमियम द्यावा; माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांची मागणी - अनिल बोंडे ताज्या बातम्या

माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी शेतकऱ्यांना पुर्वीप्रमाणे चार हजार रुपये प्रतिहेक्टर प्रीमियम देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

Anil Bonde latest news
Anil Bonde latest news
author img

By

Published : Aug 22, 2021, 4:53 PM IST

अमरावती - विदर्भात संत्र्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. मात्र, आता राज्य सरकारमुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनांतर्गत पुनर्सचित हवामान आधारित संत्रा या पीकाचा आंबिया बहर तिप्पट महागला आहे. यामुळे विमाकंपनी तर्फे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमिवर माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी शेतकऱ्यांना पुर्वीप्रमाणे चार हजार रुपये प्रतिहेक्टर प्रीमियम देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया

'संत्र्याचा पीकविमा काढणे कठीण' -

अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आपला विमा प्रती हेक्टर 4 हजार रुपये प्रमाने काढत होते. मात्र, यंदा ही रक्कम 4 हजारावरून तब्बल 12 हजार रुपये प्रती हेक्टर भरावी लागणार आहे. तसे परिपत्रक कंपन्याकडून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा पाच टक्के तर उर्वरित हिस्सा राज्य सरकारने भरायचा असतो. परंतु या महाविकास आघाडी सरकारने स्वतःच्या अंगावर आलेला हिस्सा सुद्धा शेतकर्‍यांच्या अंगावर टाकला आहे. त्यामुळे शेतकाऱ्यांना संत्र्याचा पीकविमा काढणे अतिशय कठीण झाले आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी बोंडे यांनी दिली.

हेही वाचा - अफगाणी महिलेने अमेरिकेच्या विमानात दिला गोंडस मुलीला जन्म!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.