अमरावती - जगभरात पहिला विश्व पर्यावरण दिवस 5 जून 1974 रोजी साजरा केला गेला. 1972च्या विश्व पर्यावरण संमेलनात संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने पर्यावरणाप्रती राजनैतिक व सामाजिक जागृती निर्माण करण्याचे हेतूने जागतिक पर्यावरण दिवस साजरा करायचे एकमताने ठरले. हे उद्देश लक्षात घेता मेळघाटातील अशाच एका अभियानाची व स्पर्धेची चर्चा सध्या संपूर्ण मेळघाटात जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एका तरुणाने पर्यावरण, जंगल, वन्यजीव व समाजयांच्या संरक्षण, संवर्धनकरीता 'अंगार मुक्त जंगल स्पर्धा'च्या जनजागृती अभियान मोहीम सुरू केली आहे.
अंगार मुक्त जंगल मोहिमेचे आयोजन
अंगार मुक्त वणवा मुक्त जंगलासाठी शासनाच्या मदतीने कोणते गाव, गावकरी पुढाकार घेऊन काम करते याचा प्रवास, याचा शोध म्हणजे अंगार मुक्त जंगल स्पर्धा 2021. मेळघाट व्याघ्र प्रकल्प तथा प्रादेशिक वन विभाग मेळघाटमार्फत या अंगार मुक्त जंगल मोहिमेचे आयोजन करण्यात आले. मेळघाटातील जनतेचा लोकसहभाग वाढवा याकरीता अंगार मुक्त जंगल स्पर्धा स्वरूपात ही मोहीम रचण्यात आली. मेळघाटमधील 5 प्रादेशिक वन परिक्षेत्र तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील 4 विभाग मिळून 325 गाव या उपक्रमात यावर्षी पहिल्यांदा सहभागी करण्यात आले. याकरीता निसर्गा फाऊंडेशन ही संस्था या अभियानाची माहिती व जनजागृती सहयोगी आहे.
रात्रीच्या एकूण 52 सभा
या मोहिमेची आखणी विभागीय वन अधिकारी पियुशा जगताप तसेच निसर्गा फौंडेशन चे कार्यकारी संचालक पर्यावरण अभ्यासक धंनजय सायरे यांनी केली. याकरीता सर्व वन विभागाचे अधिकरी कर्मचारी यांची साथ मिळाली. या मोहिमेचा प्रवास मेळघाट व्याघ्र प्रकल्प 22 फेब्रुवारी स्थापना दिवसापासून सुरू झाला. मेळघाटमध्ये होळीचा सण फार महत्त्वाचा असतो. तो सुरू होण्याआधी म्हणजे 25 मार्च पूर्वी गाव पंचायतच्या लोकांना अंगार मुक्त जंगल स्पर्धाबाबत माहिती देण्यात आली. 42 दिवसांमध्ये 325 गावात या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. हा प्रवास 7 लोकांच्या टीमने केला. प्रोजेकटरच्या साहाय्याने रात्रीच्या एकूण 52 सभा घेतल्या सर्वांना परिक्षेत्र विभाग देण्यात आली होती. महिनाभर घरी न जाता रोज प्रवासात 2-3 गाव करत संध्याकाळ जिथे होईल तेथे मुक्काम करत 11000 किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास या टीम ने केला. याकरीता गावगावाच्या वन रक्षकांनी, अधिकारी लोकांनी सहकार्य केले. जेवणाची व्यवस्था केली होती. तसेच रात्रीच्या मुक्कामाची सोय केली होती.
100 गुणांची स्पर्धा
अंगार मुक्त जंगल स्पर्धचा कालावधी 22 फेब्रुवारी ते 7 जुलै साधारण 4 महिन्याचा आहे. गावागावांनी अंगार मुक्त जंगल मुद्यावर काम करावे. त्याचे फोटो, रिपोर्ट विभागवार रेंजवार केलेल्या व्हाटस अॅप ग्रुपवर टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जी गावे दिलेल्या 8 मुद्यांपैकी जास्तीत जास्त मुद्यावर काम करतील. ज्या टीम आपले गाव, परिसर जंगल अंगार मुक्त ठेवतील त्यांना बक्षिसे दिले जाणार आहेत. एकूण 100 गुणांची ही स्पर्धा असल्याी घोषणा करण्यात आली.