अमरावती - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील माहितीचे संकलन करून पुस्तकरूपात संग्रहीत करण्याचे काम दिलीप महात्मे या ध्येय वेड्या तरुणाने केले आहे. १० वर्षांपासून त्याने बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील माहिती गोळा करून तब्बल २६ पुस्तकांचे संकलन केले आहे.
दिलीप महात्मे हा तरुण जिल्ह्यातील पेठ रघुनाथपूर येथील रहिवाशी आहे. मागील १० वर्षांपासून तो हे काम करत आहे. तरुण पिढी आणि अभ्यासू लोकांना या पुस्तकांचा फायदा होणार असल्याचा विश्वास दिलीपने व्यक्त केला.
या पुस्तकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे पुस्तक महत्वाचे असून त्यामध्ये अडीच हजार छायाचित्रांचा समावेश आहे. तसेच बौद्ध विहार, स्मारके याबाबतची सर्व माहिती आहे. अस्थाव्यस्थ असलेली ही माहिती पुस्तकरुपात आणल्यामुळे त्याचा फायदा तरुण पिढीला होणार असल्याचा विश्वास त्याने व्यक्त केला.