अमरावती - कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच गेल्या चौदा महिन्यांपासून शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुद्धा गेले आहेत. मात्र, 2020-21 चे संपूर्ण परीक्षा शुल्क अमरावती विद्यापीठ घेत असून हे चुकीचे असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सोपान कनेरकर यांनी व्यक्त केले आहे.
विद्यार्थ्यांचे प्रवेश व परीक्षा शुल्क माफ करा -
सध्या विद्यापीठातून आणि महाविद्यालयांमधून वाचनालय, प्रयोगशाळा व व्यायामशाळा इत्यादी अनेक प्रकारच्या सुविधाचा वापर बंद आहे. तरीदेखील हे सर्व शुल्क विद्यापीठाकडून घेतले जात आहे. विद्यार्थी लायब्ररीमध्ये घेऊ शकत नसताना सुद्धा लायबरी फी मेंटेनेस, गणवेश असे अनेक प्रकारचे शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल केले जात आहे. त्यामुळे आता विद्यापीठाने विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचे प्रवेश व परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी सोपान कनेरकर यांनी कुलगुरूंकडे किती आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा - 'गृह अलगिकरण बंद करण्याचे वैज्ञानिक सरकारने सांगावे'