ETV Bharat / state

Amravati Tribal Student Protest आदिवासी विद्यार्थ्यांचा रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या, महर्षी पब्लिक स्कूलच्या कारभारावर आक्षेप - yashomati thakur

अमरावती शहरातील (amravati city) महर्षी पब्लिक स्कुल (maharshi public school) मध्ये असणाऱ्या आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात ( tribal student hostel) होणाऱ्या अन्यायाच्या निषेधात ( protest against injustice) वसतिगृहातील शेकडो विद्यार्थी सोमवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यलयात धडकले. न्याय मिळाल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका घेत या विद्यार्थ्यांनी रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम ठोकला. दरम्यान, यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.

tribal students
आदिवासी विद्यार्थी
author img

By

Published : Sep 6, 2022, 6:07 PM IST

अमरावती अमरावती शहरातील (amravati city) महर्षी पब्लिक स्कुल (maharshi public school) मध्ये असणाऱ्या आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात ( tribal student hostel) होणाऱ्या अन्यायाच्या निषेधात ( protest against injustice) वसतिगृहातील शेकडो विद्यार्थी सोमवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यलयात धडकले. न्याय मिळाल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका घेत या विद्यार्थ्यांनी रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम ठोकला. दरम्यान, यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांचा रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

असा आहे संपूर्ण प्रकार वादग्रस्त असणाऱ्या महर्षी स्कुलच्या आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या मेळघाटातील (melghat tribal students) विद्यार्थ्यांना दहावीनंतर अंतर्गत परीक्षा देवून जे उत्तीर्ण होतील त्यांनाच अकरावीला प्रवेश देऊ, बाकीच्यांना वसतीगृहाबाहेर काढू. अशी भूमिका वसतिगृह प्रशासनाचे प्रमुख राठी (Head of Hostel Administration Rathi) यांनी घेतली. या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला. आम्ही दहावीची परीक्षा उत्तीर्ण असताना अशा अनधिकृत परीक्षेतून आमच्याबाबत निर्णय घेऊ नये अशी विद्यार्थ्यांची मागणी राठी यांनी अमान्य केल्याने आपल्याला न्याय मिळावा यासाठी हे विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. मात्र, येथे उपस्थित निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी न्याय मिळेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या मांडला.

यशोमती ठाकूर यांनी साधला संवाद जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी विद्यार्थी धडकल्याची माहिती मिळताच युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश गुहे हे रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले. त्यांनी या विद्यार्थ्यांची बाजू जाणून घेतल्यावर माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासोबत या विद्यर्थ्यांचे फोनवर बोलणे करून दिले. विद्यार्थी रात्रभर इथून हलणार नाही या भूमिकेवर ठाम असल्याने यशोमती ठाकूर यांनी सकाळपर्यंत विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण होणार नाही, त्यांना झोपायला गादी, चादर अशी व्यवस्था करून द्यावी अशा सूचना निलेश गुहे आणि कार्यकर्त्यांना दिल्या. मंगळवरी या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.