ETV Bharat / state

Amravati Student Make Sword : विद्यार्थ्यांचे 'शिवप्रेम'; तलवारीवर साकारली शिवसृष्टी - छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास

अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील ( Amravati Student Make Sword ) विद्यार्थांनी आणि शिक्षकांनी शिवजयंती ( Shiva Jayanti ) निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना ( Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti ) एक अनोखी मानवंदना दिली आहे. त्यांनी आपल्या शाळेत विविध वस्तूंचा वापर करून एक तलवार बनवली आहे. या तलवारीवर त्यांनी शिवाजी महाराजांची 'शिवसृष्टी' उभारली आहे.

Amravati Student Make Sword
तलवारीवर साकारली शिवसृष्टी
author img

By

Published : Feb 18, 2022, 3:10 AM IST

अमरावती - छत्रपती शिवाजी महाराज जयंती ( Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti ) निमित्त अमरावती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील ( Amravati Student Make Sword ) कला शिक्षकांच्या पुढाकाराने शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीतील कलाप्रेमी विद्यार्थ्यांनी दहा बाय पन्नास फुटांची तलवार साकारली आहे. या तलवारीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडणारी शिवसृष्टीही साकारली जात आहे.

तलवारीवर साकारली शिवसृष्टी

अशी साकारली जात आहे शिवसृष्टी -

कचऱ्यातून कला या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातचे मुख्याध्यापक आशिष देशमुख आणि कलाशिक्षक श्रीकांत काळबांडे यांच्या पुढाकाराने पृष्ठ, कागद, कापड, फेविकॉल, गेरू तसेच विविध रंग यांच्या साह्याने ही तलवार साकारण्यात येत आहे. या तलवारीवर जिजामातेच्या स्वरूपात चंद्रकोर काढण्यात आली असून शिवपिंड, किल्ला, ध्वज, शिवरायांचा जिरेटोप, शिवाजी महाराजांची राजमुद्रा व विविध आभूषणांनी या तलवारीवर शिवसृष्टी साकारण्यात येत असल्याचे मुख्याध्यापक आशीष देशमुख 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. ही तलवार साकारताना कलेसाठी गणित आणि भूमिती या विषयाचे किती महत्त्व आहे. याची जाणीवही विद्यार्थ्यांना करून दिली जात असल्याचे आशिष देशमुख म्हणाले.

Amravati Student Make Sword
तलवार बनवताना विद्यार्थी

शहरातील विद्यार्थ्यांना पहाता येणार तलवार -

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पर्वावर साकारण्यात येत असलेली ही तलवार आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसह अमरावती शहरातील सर्वच शाळेच्या विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून आम्ही 18 फेब्रुवारी लाज या तलवारीचे काम पूर्ण करून आमच्या शाळेत ही तलवार विद्यार्थ्यांसह शहरातील शिवप्रेमींसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करून देणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.

Amravati Student Make Sword
शिवाजी महाराजांची राजमुद्रा
Amravati Student Make Sword
तलवार बनवताना विद्यार्थी

हेही वाचा - 92 Year Old Man Get PhD : वयाच्या 92 व्या वर्षी पीएचडी प्रदान, ध्येयवेड्या आजोबांचा थक्क करणारा प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.