ETV Bharat / state

बालकांवरील लैंगिक अत्याचार जनजागृतीसाठी चित्रफीत; अमरावती ग्रामीण पोलिसांचा 'मॉडेल प्रोजेक्ट'

author img

By

Published : Nov 6, 2020, 6:25 PM IST

पोलिसांनी वेबिनारद्वारे एका चिमुकली सोबत शेजारच्या काकांकडून केला जाणार लैंगिक अत्याचार, त्यानंतर चाईल्ड केअर आणि पोलिसांच्या मदतीने शेजारच्या काकांना होणारी शिक्षा, असा सगळा प्रसंग अॅनिमेशनद्वारे रंगवून विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचाराबाबत जागृत राहण्याचा संदेश दिला आहे.

model project
मॉडेल प्रोजेक्ट

अमरावती - बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत आता बालकांमध्येच जागृती निर्माण व्हावी, आपल्यासोबत काही तरी वेगळे घडत आहे, याची जाणीव बालकांना व्हावी, या उद्देशाने अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसांनी चित्रफीत तयार केली आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील एकूण 23 शाळेतील 20 हजार विद्यार्थ्यांना वेबिनारद्वारे बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाची माहिती सांगण्यात आली. अमरावती ग्रामीण पोलिसांचा हा उपक्रम राज्यभर 'पायलट प्रोजेक्ट' म्हणून राबविले जाणार असल्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांनी दिली. ते येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन.

चित्रफीत दाखवून विद्यार्थ्यांची घेतली परीक्षा -

पोलिसांनी वेबिनारद्वारे एका चिमुकलीसोबत शेजारच्या काकांकडून केला जाणार लैगिंक अत्याचार, त्यानंतर चाईल्ड केअर आणि पोलिसांच्या मदतीने शेजारच्या काकांना होणारी शिक्षा, असा सगळा प्रसंग अनिमेशनद्वारे रंगवून विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचाराबाबत जागृत राहण्याचा संदेश दिला आहे. ही चित्रफीत परतवाडा, अंजनगाव सुर्जी, वरुड, दत्तापूर, दर्यापूर आणि तिवसा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या 23 शाळांमध्ये जाऊन दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांना ही चित्रफित दाखविल्यावर हा विषय विद्यार्थ्यांना किती समजला? हे जाणून घेण्यासाठी त्यांना बहुपर्यायी प्रश्नपत्रिका देऊन परीक्षा घेण्यात आली. चित्रफीत पाहायच्या आधी या विषयाबाबत विद्यार्थ्यांना 55 टक्के ज्ञान होते. ते चित्रफीत पाहिल्यावर 85 टक्के वाढले असल्याचे लक्षात आले, असे पोलीस अधीक्षक म्हणाले.

हेही वाचा - तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या, अन्यथा आंदोलन करु; सत्यपाल महाराजांचा सरकारला इशारा

व्यसनमुक्ती, महिला अत्याचार आणि काळ्या जादूवरही चित्रफीत -

शालेय विद्यार्थी आणि युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. व्यसनाचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्तीचा मार्ग सांगणाऱ्या माहितीची चित्रफितही अमरावती ग्रामीण पोलिसांनी तयार केली आहे. महिलांवर होणारे अत्याचार आणि आजही काळ्या जादूच्या नावावर लहान बालकांचा बळी देणे, अशा घटना घडत असताना अशा काळ्या जादूचे थोतांड आहेत. याबाबत जनजागृती करणारी चित्रफिती निर्माण करण्यात आली आहे.

पोलीस महासंचालकानी घेतली दखल -

अमरावती ग्रामीण पोलिसांनी अतिशय महत्त्वाच्या विषयांबाबत जनजागृतीच्या उद्देशाने तयार केलेल्या या चित्रफितीची पोलीस महासंचालकांनी दखल घेतली. अमरावती ग्रामीण पोलिसांचा हा उपक्रम 'पायलट प्रोजेक्ट' म्हणून राज्यभर राबविण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.