ETV Bharat / state

Amravati Police Set Record: अमरावतीच्या 'या' पोलिसानं नोंदवलाय अफलातून विक्रम, 'इंडियासह आशिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद - प्रवीण आखरे यांचा विक्रम

Amravati police set Record : पाण्यामध्ये सलग एक तास दोन मिनिटं उभं राहण्याचा नवा विक्रम अमरावती येथील पोलीस खात्यात कार्यरत कर्मचारी प्रवीण आखरे यांनी आज नोंदविलाय. त्यांच्या या विक्रमाची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालीय. याबाबत सविस्तर जाणून घेवू या.

Amravati Police Set Record
अमरावतीच्या पोलिसाचा विक्रम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 4:34 PM IST

अमरावतीच्या पोलिसाचा विक्रम

अमरावती Amravati police set Record : अमरावती शहर पोलीस विभागात कार्यरत असणारे प्रवीण आखरे हे उत्तम जलपटू आणि योगाभ्यासक आहेत. आज ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी 30 मिनिटं पाण्यात उभं राहण्याचा विक्रम नोंदविण्यासाठी शहर पोलीस दलाच्या जलतरण तलावात उतरले होते. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड त्यांनी तीस मिनिटात पूर्ण केलाय. त्यानंतर 45 मिनिटांत त्यांनी आशिया बुक ऑफ रेकॉर्ड देखील केला. आशिया बुक ऑफ रेकॉर्ड कायम केल्यावर ते पुढे आणखी 47 मिनिट पाण्यात उभे होते. अशा प्रकारे त्यांनी आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एक तास दोन मिनिटं पाण्यात उभं राहण्याचा नवा विक्रम नोंदवलाय.

51 ते 60 वयोगटात पहिलाच विक्रम : इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनोज तत्त्ववादी यांनी प्रविण आखरे यांच्या या दोन्ही विक्रमांची घोषणा केलीय. 51 ते 60 वयोगटात पाण्यात सलग एक तास दोन मिनिटं उभं राहण्याचा विक्रम आजवर कोणीही केलेला नाही. या वयोगटात हा नवा विक्रम स्थापन करणारे अजय आखरे हे एकमेव असल्याचे मनोज तत्ववादी यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय.

पोलीस आयुक्तांनी दिल्या शुभेच्छा : अमरावती शहर पोलिसात कार्यरत असणारे प्रवीण आखरे यांनी केलेल्या या विक्रमी कामगिरीबाबत पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. प्रवीण आखरे यांनी हे दोन्ही विक्रम नोंदविले, त्यावेळी पोलीस आयुक्त हे सपत्नीक जलतरण तलावावर उपस्थित होते. आपण पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळेच हा विक्रम नोंदविण्यासाठी सराव करू शकलो, अशी प्रतिक्रिया प्रवीण आखरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलीय.

  • 28 मे रोजी रचला होता विक्रम : प्रवीण आखरे यांनी आज पाण्यात उभे राहण्याचा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविलाय. यापूर्वी याच वर्षी 28 मे रोजी त्यांनी पाण्यामध्ये अर्धा तास योगासन करण्याचा विक्रम केला होता. त्या विक्रमाची नोंद देखील इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे.

हेही वाचा :

  1. Naveen Patnaik : नवीन पटनायक यांचा नवा रेकॉर्ड, बनले सर्वाधिक काळ पदावर राहणारे दुसरे मुख्यमंत्री
  2. Pune Feta Tying Records : तब्बल ४०३ महाराष्ट्रीयन फेटे बांधून साकारला 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'
  3. Indias Got Talent 10 : सोलापूरच्या आदित्यचे पत्ते फेकण्याचे अजब कौशल्य, इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये चीनचा मोडला विश्वविक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.