अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीलाच परवानगी आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या पासच्या आडून लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रक पोलिसांच्या हाती लागला आहे. अंजनगांव सूर्जी येथे हा प्रकार उघडकीस आला.
सध्या अत्यावश्यक सेवेची वाहतूक करण्याचे पासेस किराणा दुकानदार, मेडिकल व्यावसायिक, भाजीपाला व्यावसायिक यांना दिले जातात. परंतू, या पासेसच्या आड अवैध व्यवसाय करणारेही माल वाहतूक करत असल्याचा प्रकार गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांनी उघडकीस आणला. सदर वाहन क्र. एम. एच. 30 ए 9111 या वाहनात लाकड असल्याचे उघडकीस आले.
सध्या लाकूड वाहतुकीस कुठलीही परवानगी नाही. तरीही पास आला कुठून याचा पोलीस प्रशासन शोध घेत आहे. पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी समीर खाँ मुख्तार खाँ यांंच्याविरुद्ध कलम १८८ ,२६९, २७१ भादंवि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायदा २००५ कलम ५१( ब), सहकलम ११ महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना २०२० साथीचे रोगप्रतिबंधक कायदा कलम २,३,४, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पास कुठून आला, तो कोणी दिला, कोणत्या कामासाठी दिला, त्यावर किती दिवसांची मुदत होती आणि कोणत्या कामाकरिता देण्यात आला होता? या संपूर्ण बाबीची पोलीस प्रशासना चौकशी करत आहे.