ETV Bharat / state

रंग उधळून मेळघाटात पारंपरिक फगावा उत्सव साजरा

author img

By

Published : Apr 2, 2021, 3:06 PM IST

Updated : Apr 2, 2021, 3:27 PM IST

सलग पाच दिवस हा सण साजरा केला जात असताना या दरम्यान मेळघाटात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून फगावा अर्थात पैसे मागितले जातात. सध्या मेळघाटात रंग उधळून, पारंपरिक नृत्य आणि गीत गात रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांना अडवून फगावा मागितला जातो आहे.

अमरावती फगावा उत्सव
अमरावती फगावा उत्सव

अमरावती - मेळघाटात सर्वात मोठा सण म्हणून होळी साजरी केली जाते. सलग पाच दिवस हा सण साजरा केला जात असताना या दरम्यान मेळघाटात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून फगावा अर्थात पैसे मागितले जातात. सध्या मेळघाटात रंग उधळून, पारंपरिक नृत्य आणि गीत गात रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांना अडवून फगावा मागितला जातो आहे.

मेळघाटात अशी होते होळी साजरी

सातपुडा पर्वत रांगेत वसलेले आदिवासी बांधव परंपरेनुसार होळी सण साजरा करतात. रोजगारासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर मंजुरीसाठी भटकंती करणारा मेळघाटातील प्रत्येक आदिवासी हा होळीनिमित्त मेळघाटात घरी परत येतो. होळीच्या दिवशी शेतात आलेल्या पिकाचे पूजन केले जाते. होळीच्या दुवशी सर्व गावकरी एका ठिकाणी येऊन होळी पेटवतात. यावेळी पारंपरिक नृत्यावर आदिवासी बांधव ताल धरतात. आदिवासींचे दैवत असणाऱ्या मेघनाथाचे पूजन होळीला केले जाते. मोहफुलांच्या रसापासून तयार करण्यात येणारी सिड्डू अर्थात दारू सर्व मिळून सेवन करतात. बासरी, कीनकी आणि ढोलकीच्या तालावर आदिवासी बांधव रात्रभर तल्लीन होऊन नृत्य करतात. दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला मासोळी, गोड पुरी, गोड भात असे जेवण केले जाते. होळी निमित्त मेळघाटात अनेक ठिकाणी यात्रा ही भरते.

वहिनी-दिरांची मस्करी

होळीच्या पर्वावर आदिवासी समाजात पाच दिवसांचा फगव उत्सवात वहिनी आणि दीर, मामा आणि भाचे हे एकमेकांची थट्टा मस्करी करतात. या थट्टा मस्करीच्या आशयावरील गाणी प्रचलित आहेत. विशेष म्हणजे फगावा मागताना म्हटले जाणारे लोक गीत वहिनी-दिरांच्या संबंधावरील आशयाचेच असतात.

फगावासाठी रस्ता बंद

होळी पासून पाच दिवस प्रतेक गावातील रहिवासी आपल्या गावालगत जंगलातून जाणारा रस्ता दोर बांधुन अडवतात. रस्ता बंद असल्याने वाहन थांबताच वाहनातील लोकांना पैसे मागितले जातात. 5 ते 10 रुपये घेऊन आदिवासी बांधव रस्ता मोकळा करून देतात. अनेकदा मेळघाट बाहेरून येणारे काही लोक फगव्यासाठी रस्त्यावर नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत नृत्यात सहभागी होऊन मेळघाटातील होळी आणि फगावा उत्सवाचा आनंद लुटतात.

Last Updated : Apr 2, 2021, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.