ETV Bharat / state

Amravati Graduate Constituency Election : अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक; अर्ज भरण्याची शेवटची तारिख

author img

By

Published : Jan 12, 2023, 11:53 AM IST

Updated : Jan 12, 2023, 1:09 PM IST

सध्या राज्यात पदवीधर निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात विविध जिल्ह्यात 30 जानेवारीला निवडणूका होणार आहेत. त्यासाठी भाजपकडून डॉ रणजीत पाटील, प्रहारकडून किरण चौधरी आणि इतर पक्षांकडून उमेदवार जाहिर करण्यात आले आहेत.

Amravati Graduate Constituency Election
अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक

अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक 30 जानेवारीला होत आहे. यात सर्व पक्ष जोमात दिसत आहेत. प्रत्येक जण आपले भक्कम उमेदावर जाहीर करण्यावर भर देत आहेत. यात भाजपकडून डॉ. रणजीत पाटील यांचे नाव चर्चेत आहे. तर काँग्रेसकडून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

काय असते पदवीधर मतदारसंघ निवडणूक ? : महाराष्ट्राच्या विविध भागातील पदवीधर त्या त्या भागातून त्यांचा प्रतिनिधी आमदार निवडून देतात. पदवीधर मतदार संघ असतो ही गोष्ट खेडेगावातील मतदारांना जास्त प्रमाणात प्रचलित नाही, याचा प्रसार करणे ही एक महत्त्वाची व काळाची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्याला पदवीधर मतदारसंघ असतो. त्या मतदारसंघातून पदवीधारक निवडणुकीसाठी पात्र असतो.

भाजप उमेदवार डॉ. रणजीत पाटील : अमरावती पदवीधर मतदार संघात डॉ. रणजीत पाटील यांचा सलग दोन वेळा विजय झाले आहेत. आता यावेळी देखील रणजीत पाटील हेच निवडून येणार असा विश्वास भाजपचे विदर्भ महामंत्री जैन सुख संचेती यांनी नुकताच व्यक्त केला आहे . स्वतः डॉ. पाटील यांनी देखील आपण पदवीधरांसाठी भरभरून काम केल्याचा पाढा सहा वर्षानंतर पहिल्यांदाच अमरावतीत वाचून दाखवला आहे. एकूणच डॉ. पाटील यांच्या विजयासाठी भाजपमधील लहानात लहान कार्यकर्ता देखील झपाटलेला असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित अशी आशा भाजपच्या सर्व स्थानिक नेत्यांत आहे.

अशी झाली 2017 ची निवडणूक : विशेष म्हणजे 2017 च्या निवडणुकीत त्यावेळी मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे स्वतः डॉ. पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. यावेळी देखील ते उपमुख्यमंत्री म्हणून पाटलांच्या सोबत असतील यात शंका नाही. सलग तीस वर्ष लुटा आणि प्राचार्य बीटी देशमुख यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या अमरावती पदवीधर मतदार संघात भाजपने 2012 मध्ये डॉ पाटील यांना बी टी देशमुख यांच्या विरोधात उमेदवारी दिली. पहिल्याच निवडणुकीत भाजपने नियोजित रणनीती आखून प्रचंड मतदार नोंदणी करून घेतली आणि प्राध्यापक बीपी देशमुख यांचा ऐतिहासिक पराभव केला होता. 2017 च्या निवडणुकीत आलेल्या पराभवाने प्राध्यापक बीपी देशमुख यांनी आता निवडणूक लढायची नाही असा निर्णय घेतला होता.

पदवीधर निवडणूकीत रणजीत पाटील यांची बाजी : नोटाला नेहमीच काँग्रेसची साथ राहिली होती. 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके हे निवडणूक रिंगणात उतरले होते. खोडके यांच्यासोबतच भाजपचे बंडखोर डॉक्टर अविनाश चौधरी यांच्यासह आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे प्राध्यापक डॉक्टर दीपक धोटे हे देखील निवडणूक रिंगणात होते. संजय खोडके आणि डॉ. पाटील यांच्यात लढत होणार असे स्पष्ट असताना डॉ. रणजीत पाटील हे 35 हजाराहून अधिक मतांनी खोडक्यांपेक्षा समोर निघाले. 2017 च्या निवडणुकीत 61 हजार 992 मतांचा कोटा निश्चित असताना डॉ. पाटील यांना 78,051 मते मिळाली तर संजय खोडके यांना केवळ 34,154 मतं मिळाली होती. डॉक्टर अविनाश चौधरी आणि बच्चू कडू यांचे उमेदवार प्राचार्य डॉक्टर दीपक धोटे हे दूरपर्यंत देखील कुठे शर्यतीत नव्हते.

प्रहार संघटनेकडून उमेदवार जाहीर : बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्यावतीने महाराष्ट्र इंग्लिश स्कूल टीचर्स असोसिएशन अर्थात मेस्टाचे किरण चौधरी यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. शिंदे फडणवीस सरकारने आपल्या काही प्रस्तावांची दखल घेतली नसल्यामुळे या निवडणुकीत आपण उमेदवार दिल्याचे बच्चू कडू म्हणत आहेत. 2017 च्या निवडणुकीत ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर दीपक धोटे हे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे उमेदवार होते. 2017 च्या निवडणुकीत बच्चू कडू यांच्या उमेदवाराला पदवीधर मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नव्हता. आता पूर्णतः नवख्या असणाऱ्या किरण चौधरी यांना उमेदवारी देऊन बच्चू कडू यांना केवळ या निवडणुकीत चर्चेत राहायचे असल्याचेच स्पष्ट होते.

काँग्रेसचे अद्याप काही खरे नाही : महाविकास आघाडीकडून अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस लढविणार असून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे या निवडणुकीत काही खरे नाही अशीच चर्चा रंगत आहे. आतापर्यंत डॉ. सुनिल देशमुख, डॉ. सुधीर ढोणे, मिलिंद चिमोटे, श्याम प्रजापती, डॉ. लोढा, भैया मेटकर या सहा उमेदवाराची नावे आमच्यापर्यंत आले असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. निवड केलेला उमेदवार हा महाविकास आघाडीचा असेल. असे सांगण्यात येत आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची‎ चाचपणी : अमरावती‎ विभागातील अमरावती, अकोला,‎ बुलडाणा, वाशीम व यवतमाळ या पाचही‎ जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी नाना पटोलेंनी चर्चा केली. त्यातून काही नावे पुढे आलीत,‎ त्याची संख्या समोर ठेवली आहे.‎पदवीधरांचा नोकरीच्या बाबतीत झालेला‎ भ्रमनिरास, राज्यात सुरू असलेले‎ दहशतवाद व भीतीचे वातावरण, महागाई‎ आदी मुद्यांवर ही निवडणूक लढली‎ जाईल, असेही पटोले यांनी यावेळी स्पष्ट‎ केले.

Last Updated : Jan 12, 2023, 1:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.