अमरावती - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शामसुंदर निकम यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयातील मुख्य फार्मसिस्टही कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.
वर्षभरापासून हाताळताहेत कोविड परिस्थिती -
61 वर्षीय डॉ. शामसुंदर निकम हे गत वर्षभरापासून कोविड परिस्थिती हाताळत आहेत. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी हाताळत असताना आता डॉ. शामसुंदर निकम हेच कोरोनाबधित झाले आहेत.
जिल्ह्यात आज 520 बाधितांची नोंद -
अमरावती जिल्ह्यात बुधवारी एकूण 520 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण 11 बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या 5 हजार 889 सक्रिय रुग्ण आहेत.