ETV Bharat / state

Amravati Crime: अमरावती हादरलं! सासू आणि मेहुण्याची जाळून हत्या केल्यावर जावयाची आत्महत्या

Amravati Crime पत्नी माहेरी निघून गेल्यामुळे संतप्त पतीनं पत्नीच्या माहेरी जाऊन सासू आणि मेहुण्याला आधी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांवरही पेट्रोल टाकून त्यांची हत्या केली. सासू आणि मेहुण्याला जाळून मारल्यावर जावयानेदेखील आत्महत्या केली. अमरावती जिल्ह्यातील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वंडली या गावात ही घटना सोमवारी पहाटे घडली. लताबाई सुरेश भोंडे(47), प्रणय सुरेश भोंडे(22) आणि आशिष ठाकरे असे या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

Amravati Crime
Amravati Crime
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 7:09 PM IST

अमरावती Amravati Crime- वरुड येथील रहिवासी असणारा आशिष ठाकरे याने वनली येथील श्रीमती लताबाई भोंडे यांच्या मुलीशी सहा महिन्यापूर्वी प्रेम विवाह केला होता. आशिष ठाकरे हा पत्नीला रोज दारू पिऊन मारत असल्यामुळे ती तीन महिन्यापूर्वी माहेरी निघून आली होती. आशिष हा सासरी जाऊन पत्नीला त्रास देत असल्यामुळे सासू लता भोंडे यांनी मुलीला तिच्या मावशीच्या घरी राजुरा बाजार येथे राहण्यास पाठविले होते.

रविवारी आशिष ठाकरे याने आपल्या मित्राला वंडली येथे सोडून देण्यास सांगितले. मंडलीला येताना त्याने रस्त्यात गाडीत पेट्रोल भरले. एका काचेच्या बॉटलमध्ये शंभर रुपयांचे पेट्रोलदेखील भरून घेतले. आशिषला त्याच्या मित्राने वल्ली येथे सोडल्यावर आशिष थेट लताबाई भोंडे यांच्या घरी गेला. त्याने सासू लताबाई भोंडे यांच्यासह मेहुणा प्रणयसोबत वाद घातला. यापूर्वी आशिषने या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. सोमवारी पहाटे आशिषने सासू आणि मेहुण्यावर पेट्रोल शिंपडून त्यांना पेटवून दिले. यानंतर त्याने मावस सासरे दिनेश निकम यांच्याशी मोबाईल फोनवर संपर्क साधून लताबाई आणि प्रणय यांना मारून टाकल्याचे सांगितले. तसेच स्वतःही आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. यानंतर आशिषने आत्महत्या केली.

90 वर्षांची आजी सुखरूप- आशिष ठाकरे याने सासू आणि मेहुण्याला जाळून ठार मारल्यावर घराच्या आतल्या खोलीत लताबाई भोंडे यांच्या 90 वर्षाच्या सासू चंद्रकला झोपल्या होत्या. त्या घरात असल्याची आशिषला माहिती नव्हती. दरम्यान पहाटे बोंडे यांच्या घरातून धूर निघत असल्याचे आढळून येतात ग्रामस्थांनी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने घराचा दरवाजा उघडून आग विझवण्यात आली. यावेळी घरात तीन तीन व्यक्तींचे मृतदेह पूर्णतः झालेल्या अवस्थेत आढळून आले.

पोलीस करीत आहेत तपास- या घटनेमुळे वंडली गाव हादरले आहे. राजुरा बाजार येथील रहिवासी दिनेश निकम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आशिष ठाकरे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळावर श्वान पथक गुन्हे तपास पथक यांना पाचारण करून तपासाच्या दृष्टीने आवश्यक पुरावे पोलिसांनी हस्तगत केले. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक अविनाश बारगड अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, विभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. बेनोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल ठाकरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

हेही वाचा-

  1. Father Killed Daughter: 'म्हणून' वडिलांनीच केला पोटच्या मुलीचा खून; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का...
  2. Mumbai Crime News : नात्याला काळीमा! सासऱ्यानं खिडकीतून घुसून सुनेवर केला अत्याचार; गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.