ETV Bharat / state

पोलीस आयुक्तांची 'नो मास्क नो सवारी' मोहीम - अमरावती 'नो मास्क नो सवारी' मोहीम

राज्य अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मात्र, दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी शहरात 'नो मास्क नो सवारी' मोहीम सुरू केली आहे.

Rikshaw Drivers
रिक्षाचालक
author img

By

Published : Oct 2, 2020, 12:44 PM IST

अमरावती - राज्यात वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी रिक्षाचालकांच्या मदतीने 'नो मास्क नो सवारी' ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रवाशाने मास्क लावलेला असेल तरच, त्याला रिक्षामधून प्रवास करता येणार आहे.

अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी शहरातील रिक्षा चालकांसाठी एक मोहीम सुरू केली

राज्यात आता अनलॉक-५ सुरू झाले आहे. त्यामुळे शहरात लोकांची वर्दळही वाढली आहे. परिणामी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात रिक्षाने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. रिक्षा हे वाहन लहान असलल्याने प्रवासी अगदी एकमेकांच्या जवळ बसून प्रवास करतात. त्यामुळे कोरोना संसर्गाची जास्त शक्यता असते. हे टाळण्यासाठी 'नो मास्क, नो सवारी' ही मोहीम राबवत असल्याचे पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी सांगितले.

या मोहिमेअंतर्गत प्रत्येक रिक्षा चालकाला मास्क लावणे बंधनकारक आहे. वाहनामध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी मास्क लावणे सक्तीचे केले आहे. या नियमांचे पालन केले गेले नाही तर, आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करणार, असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.