ETV Bharat / state

Heavy Rain In Amravati : मुसळधार पावसामुळे अमरावती - चांदूरबाजार रस्ता बंद - Amravati Chandurbazar road

अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पेढी नदीला पूर आला. त्यामुळे शिराळा, पुसदा, साहूर, नांदोरा, टिंबा, टाकरखेडा, शंभू, या गावांना पुराचा फटका ( villages suffer due to Floods ) बसला आहे. या गावांचा एकमेकांशी संपर्क तूटला ( many villages lost contact ) आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे.

Heavy Rain In Amravati
मुसळधार पाऊस
author img

By

Published : Jul 5, 2022, 3:37 PM IST

अमरावती - अमरावती जिल्ह्यात मंगळवारी पहाटे मुसळधार पाऊस कोसळला ( Heavy rain fall ). त्यामुळे पेढी नदीला पूर आला होता. आलेल्या या पुरामुळे अमरावती चांदूर-बाजार मार्ग बंद झाला ( Amravati-Chandurbazar road closed ) असून या मार्गावरील गावांमध्ये पाणी शिरले आहे.

मुसळधार पावसामुळे अमरावती - चांदूरबाजार रस्ता बंद

पेढी नदीला पूर - मुसळधार पावसामुळे पेढी नदीला पूर आला असून शिराळा, पुसदा, साहूर, नांदोरा, टिंबा, टाकरखेडा, शंभू, या गावांना पुराचा फटका बसला ( villages suffer due to Floods ) आहे. या गावांचा एकमेकांशी संपर्क तूटला ( many villages lost contact ) आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे ( Water seeped into the villages ) ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे. शिराळा पुसदा या गावांचा संपर्क तुटला असून साहू या गावापासून अमरावती शहरात येण्यासाठीचा 30 किलोमीटरचा रस्ता बंद झाला आहे. ग्रामस्थांना मोठा फेरा घेऊन सुमारे 75 किलोमीटर अंतर पार करून अमरावतीला यावे लागत आहे. परिवहन महामंडळाच्या काही गाड्या देखील या गावांमध्येच अडकून आहे.

शेत शिवारात पाणी - मुसळधार पावसामुळे पेढी नदीला पूर आल्याने पुराचे पाणी नदीकाठी वसलेल्या गावांमधील शेत शिवारात शिरले. सध्या सर्व शेत शिवारात पाणीच पाणी झाले आहे. मुसळधार पावसामुळे या सर्व गावातील शेती खरडून गेली आहे. गेल्या वर्षी 16 जूनला पूर आला होता.

ग्रामस्थांचा रोष - चांदूरबाजार अमरावती आणि भातकुली तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या वर्षी 16 जूनला झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला होता. आज देखील गेल्या वर्षी पुराचा तडाखा सहन करणाऱ्या या गावांमध्ये पाणी शिरले. वर्षभरात शासनाच्यावतीने कुठलेही नियोजन, उपाययोजना करण्यात आल्या नाहीत असा रोष ग्रामस्थांच्यावतीने व्यक्त केला जातो आहे.

हेही वाचा - Mumbai Rain : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी रस्त्यावर साठले पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.