अमरावती : दोन खाजगी वाहनांच्या धडकेत तवेरा गाडीतील 11 जणांचा मृत्यू झाला (11 people died in Accident ) आहे. परतवाडा- बैतुल या आंतरराज्य मार्गावर झल्लार - बुधगाव दरम्यान काल मध्यरात्री 2 वाजता दरम्यान हा अपघात झाला( Accident on Paratwada Baitul Interstate route ) आहे. बसवर आदळून तवेराच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला. चालकाला डुलकी आल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रथम दर्शनी समोर आले .
मृतांच्या परिवाराला 2 लाखांची मदत : मृतांच्या परिवाराला 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. भीषण अपघाताने या परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे. घटनेतील सर्व मध्य प्रदेशातील आहेत मृतांच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा मध्य प्रदेश सरकारने केली ( MP Government announce 2 lakhs financial help ) आहे.
राष्ट्रपती, पतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक : या घटनेसंदर्भात राष्ट्रपती टोपी मुर्मु आणि पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त करतानाच तातडीने मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखाच्या मदतीची घोषणा केली आहे.
चालकाच्या डुलकीने अपघात : मध्यरात्री २ वाजता अपघात झाल्यानंतर पहाटे अपघातातील मृत परतवाडा मेळघाटच्या धारणी, चिखलदरा व इतर परिसरातील असल्याची चर्चा पसरली होती मात्र, मध्य प्रदेश प्रशासनाने सर्व मृतक बैतुल परिसरातील असल्याचे जाहीर केले ( Accident due to driver falling asleep ) आहे. मृताची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठया प्रमाणात परिश्रम घ्यावे लागले.
हंगाम आटोपून मजूर जात होते गावी : मृतांमध्ये तीन महिलांसह दोनच चिमुकल्यांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांनी जीव गमावला. मेळघाट व त्याच्या सीमा रेषेवरील मध्यप्रदेशच्या आदिवासी विदर्भ, मराठवाडा शेतातील पिके कापण्यासाठी मागील दीड महिन्यापासून वास्तव्याला होते. पीक कापणीची कामे आटोपत असल्याने दिवाळीपूर्वी अनेक कुटुंबे गावी गेली तर काही आता जात आहेत. अपघातानंतर संपूर्ण वाहतूक रात्रीला काहीवेळासाठी ठप्प झाली होती. बैतूलचे जिल्हाधिकारी अमरबीर सिंह व पोलीस अधीक्षक सीमाला प्रसाद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
परिसरात पसरली शोककळा : त्यात झल्लार येथील एक चिलखार व महादगाव येथील प्रत्येकी पाच अशा एकूण 11 जणांचा मृत्यू झाला. चालक लक्ष्मण भुमकर (३० रा. झल्लार ), किशन जावस्कर (३२), कुसुम जावस्कर (२८), अनारकली आवस्कर, (३५) संध्या आवस्कर 14). अभिराज जावस्कर (दीड वर्ष सर्व महदगांव) अमर पुर्वे (३५) मंगल सिंह उड़के (३७), नंदकिशोर दुर्वे (४८) स्वामराव झरबडे (४०) रामकली झरबड़े (३५. निवासी सर्व रा. विद्यार) अशी मृतांची नावे आहेत. यात बसगाडीचा चालक जखमी झाला असून त्याला उपचारानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.