अमरावती - तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना अमरावती विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मुरलीधर वाडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( Dr Muralidhar Wadekar arrest ) अटक केली आहे. उच्च शिक्षण सहसंचालक ( Joint Director Higher Education arrest ) यांच्या या प्रतापामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ. वाडेकर यांच्या विद्युत नगर येथील निवासस्थानी पोलिसांनी ( धाड टाकली. यावेळी त्यांच्या घरातून 36 लाख 82 हजार रुपये रोख आणि दहा लाख रुपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने ( Gold seized from Muralidhar Wadekar ) जप्त केले आहे.
असे आहे संपूर्ण प्रकरण- अमरावती विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मुरलीधर वाडेकर ( bribe taken by Muralidhar Wadekar ) यांच्याकडून सहयोगी प्राध्यापक या पदासाठी वेतन निश्चिती सर्विस बुकवर नोंद तसेच सहयोगी प्राध्यापक या पदासाठी प्रस्ताव मंजूर करण्यास तीस हजार रुपयांची लाच मागण्यात आली. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक ( Amaravati ACB ) विभागाकडे 29 जून रोजी दाखल झाली होती. शुक्रवारी दुपारी ठरल्याप्रमाणे उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर मुरलीधर वाडेकर यांनी संबंधितांकडून तीस हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मुरलीधर वाडेकर यांच्या विरोधात गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई- अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलीस उपाधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या पथकात असणाऱ्या पोलीस निरीक्षक सतीश उंबरे, युवराज राठोड, शैलेश कडू यांनी सापळा रचला. यांनी लाचखोर उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मुरलीधर वाडेकर यांना ताब्यात घेतले.
हेही वाचा-Acb Trap Police : लाच स्वीकारणाऱ्या पोलीस शिपायासह एकाविरुद्ध गुन्हा