अमरावती - जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी, तसेच सरकारने आखून दिलेल्या कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Guardian Minister Yashomati Thakur ) यांनी केले. तसेच नियमांचे पालन केले तर कोरोनावर मात करता येईल, असेही त्या म्हणाल्या. ( Yashomati Thakur on Corona Rules ) कोरोना परिस्थितीवर आयोजित आढावा बैठकीनंतर त्या बोलत होत्या. ( Amravati District Corona Review Meeting )
दुसरा डोस फक्त 45 टक्के लोकांनी घेतला -
अमरावती जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 12 वर पोहोचला आहे. ही बाब चिंताजनक असून नागरिकांनी दक्षता पाळायला हवी. त्यासाठी राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर करणे, तसेच वारंवार हात धुणे हे सातत्याने व्हायला पाहिजे. जिल्ह्यातील 80 टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, केवळ 45 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा - Amaravati Vaccination : पहिल्या लसीकरणात हात बधिर, तर दुसऱ्या डोसमध्ये निकामी होण्याचा दावा..
नागरिकांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे. नुकत्याच दोन कोरोना रुग्णांच निधन झाले. त्यापैकी एका रुग्णाने लसीचा दुसरा घेतला नव्हता, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे सर्वांनी लस घेणे आवश्यक असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सुसज्ज असून बेड व्यवस्था, ऑक्सिजन तसेच औषधोपचारांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. नागरिकांनी चिंता करण्याची गरज नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोना आढावा बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य अधिकारी, तसेच अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.