ETV Bharat / state

अमरावती: तिवसा पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा; सहाही उमेदवारांचा दणदणीत विजयी - Congress Vice President Yashomati Thakur

काल अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे व तिवसा या तीन पंचायत समितींसाठी निवडणूक पार पडली होती. आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली असून तिवसा पंचायत समितीतील सहाही जागांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत मतदार संघात पकड कायम ठेवली आहे.

amravati
जल्लोष साजरा करताना काँग्रेस कार्यकर्ते
author img

By

Published : Dec 9, 2019, 1:53 PM IST

Updated : Dec 9, 2019, 2:15 PM IST

अमरावती- जिल्ह्यातील तीन पंचायत समितींमध्ये निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकींचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यात तिवसा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लढलेले सहा पैकी सहाही उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. तर, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

माहिती देताना काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर

काल अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे व तिवसा या तीन पंचायत समितींसाठी निवडणूक पार पडली होती. आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली असून तिवसा पंचायत समितीतील सहाही जागांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत मतदार संघात पकड कायम ठेवली आहे. तिवसा पंचायत समितीच्या ६ सर्कलसाठी एकूण २८ उमेदवार रिंगणात होते. मात्र, हे सहाही सर्कल जिंकण्यात काँग्रेसला यश आले आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर आज फटाके फोडून, मिठाई वाटून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

हही वाचा- ..तरीही वरूड तालुक्यात 0 टक्के नुकसान; कृषी विभागाचा धक्कादायक अहवाल

Intro:अमरावती: तिवसा पंचायत समितीवर काँग्रेस चा झेंडा.
सहा पैकी सहाही उमेदवार दणदणीत विजयी.
------------------------------------------------------------
अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील तीन पंचायत समिती निवडणूकीचे निकाल आज जाहीर झाले असून काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आ यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तिवसा पंचायत समिती वर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.यात सहा पैकी सहाही उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे.तर शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

काल अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे व तिवसा या तीन पंचायत समिती साठी निवडणूक पार पडली होती.आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली असून सहा ही जागांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत मतदार संघात पकड कायम ठेवली आहे.दरम्यान आज फटाके फोडून, मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी जलोश साजरा केला.....
तिवसा पंचायत समितीच्या ६ सर्कल साठी एकूण २८ उमेदवार हे रिंगणात होते.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Dec 9, 2019, 2:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.