ETV Bharat / state

अमरावतीत चार बिबट्यांचा जनावरांच्या गोठ्यावर हल्ला, एका गाईची शिकार, एक जखमी - चांदुर रेल्वे

शहरापासून अवघ्या काही अंतरावर वैष्णवदेवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर हिल टॉप कॉलनी आहे. अवघ्या चौदा-पंधरा घरांच्या या कॉलनीत बांगरे यांचा गाईंचा गोठा आहे. या गोठ्यात शुक्रवारी दोन गाई असताना, रात्री दहा वाजेच्या सुमारास या गोठ्यावर बिबट्यांनी हल्ला केला.

चार बिबट्याचा गाईच्या गोठ्यावर हल्ला
author img

By

Published : Aug 24, 2019, 6:29 PM IST

अमरावती - येथील वडाळी-पोहरा जंगलात बिबट्यांची दहशत चांगलीच वाढली आहे. शुक्रवारी वैष्णवदेवी मंदिर परिसरात हिल टॉप कॉलनी येथील गाईच्या गोठ्यावर चार बिबट्यांनी रात्री हल्ला चढवला. यात एका गाईची शिकार झाली. तर दुसरी गाय गंभीर जखमी आहे. या परिसरात पंधरा दिवसात बिबट्यांने केलेल्या शिकारीची ही चौथी मोठी घटना आहे.

चार बिबट्याचा गाईच्या गोठ्यावर हल्ला

शहरापासून अवघ्या काही अंतरावर चांदुर रेल्वे मार्गावर वडाळी-पोहऱ्याच्या जंगलात वैष्णवदेवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर हिल टॉप कॉलनी आहे. अवघ्या चौदा-पंधरा घरांच्या या कॉलनीत बांगरे यांचा गाईंचा गोठा आहे. या गोठ्यात शुक्रवारी दोन गाई असताना, रात्री दहा वाजेच्या सुमारास या गोठ्यावर बिबट्यांनी हल्ला केला. हल्ला करणाऱ्या बिबट्यांची संख्या चार असल्याचे काहीजणांचे म्हणणे असून गोठ्या शेजारीच घर असणाऱ्यांनी मात्र आम्ही आठ बिबटे पाहिलेत असे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

बिबट्यांनी गोठ्यात असणाऱ्या दोन गाईंवर हल्ला चढवला. या हल्ल्यात एक गाय जखमी झाली आणि तिने पळ काढला. दुसऱ्या गाईवर मात्र बिबटे तुटून पडले. भल्यामोठ्या गाईला गोठ्यातून बाहेर खेचत आणून बिबट्यांनी तिची शिकार केली. परिसरात राहणाऱ्या अनेकांनी घराचे दार बंद करुन खिडकीतून हा सारा प्रकार पहिला. गाईला मारुन बिबटे निघून गेलेत. आज सकाळी या घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यावर आधी वन कर्मचारी पाहणी करण्यासाठी आले. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी शिकार केलेल्या गाईला खाण्यासाठी बिबट्या परत येईल म्हणून गोठ्यात कॅमेरा बसवले आहेत.

या भागातील जंगल चांगलेच घनदाट झाले असल्याने बिबट्या आणि अन्य प्राण्यांची संख्याही वाढली आहे. या जंगलात पंचवीस ते तीस बिबट्या असून अनेकदा तीन-चार बिबट्या एकत्र अनेकांना दिसले आहेत. नागरी वसाहतीत बिबट्या यायला लागले असल्याने राज्य राखीव पोलीस दल, वसाहत, वैष्णोदेवी मंदिर परिसरातील राहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Intro:वडाळी-पोहरा जंगलात बिबट्यांची दहशत चांगलीच वाढली आहे. शुक्रवारी वैष्णोदेवी मंदिर परिसरात हिल टॉप कॉलनी येथील गाईच्या गोठ्यावर चार बिबट्यांनी शुक्रवारी रात्री हल्ला चढवून एका गाईची शिकार केली तर दुसरी गाय गंभीर जखमी झाली. या परिसरात पंधरा दिवसात बिबट्यांने केलेल्या शिकारीची ही चौथी मोठी घटना आहे.

Body:अमरावती शहरापासून अवघ्या काही अंतरावर चांदुर रेल्वे मार्गावर वडाळी-पोहऱ्याच्या जंगलात वैष्णोदेवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर हिल टॉप कॉलनी आहे. अवघ्या चौदा-पंधरा घरांच्या या कॉलनीत बांगरे यांचा गाईचा गोठा आहे. या गोठ्यात शुक्रवारी दोन गाई असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास या गोठ्यावर बिबट्यांनी हल्ला केला. हल्ला करणाऱ्या बिबट्यांची संख्या चार असल्याचे काहीजणांचे म्हणणे असून गोठ्या शेजारीच घर असणाऱ्यांनी मात्र आम्ही आठ बिबटे पाहिलेत असे 'ईटीव्ही भरत'शी बोलताना सांगितले.
बिबट्यांनी गोठ्यात असणाऱ्या दोन गाईंवर हल्ला चढवला. या हल्ल्यात एक गाय जखमी झाली आणि तिने पळ काढला. दुसऱ्या गाईवर मात्र बिबटे तुटून पडलेत. भल्यामोठ्या गाईला गोठ्यातून बाहेर खेचत आणून बिबट्यांनी तिची शिकार केली. परिसरात राहणाऱ्या अनेकांनी घराचे दार बंद करून खिडकीतून हा सारा प्रकार पहिला. गाईला मारून बिबटे निघून गेलेत. आज सकाळी या घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यावर आधी वन कर्मचारी पाहणी करण्यासाठी आलेत. त्यानंतर वन केमचाऱ्यांनी शिकार केलेल्या गाईला खाण्यासाठी बिबट परत येईल म्हणून गोठ्याला कॅमेरा लावला.
या भागातील जंगल चांगलेच घनदाट झाले असल्याने बिबट आणि अन्य प्राण्यांची संख्याही वाढली आहे. या जंगलात पंचवीस ते तीस बिबट असून अनेकदा तीन कधी चार बिबट एकत्र अनेकांना दिसले आहेत. नागरी वसाहतीत बिबट यायला लागले असल्याने राज्य राखीव पोलीस दल वसाहत, वैष्णोदेवी मंदिर परिसरातील राहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.