अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर कृषी अधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी सतत गैरहज राहात असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर आज अचानक युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश मारोडकर यांनी शेतकऱ्यांसोबत कृषी अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी कृषी अधिकारी कार्यालयात हजर नव्हते, तसेच इतर देखील अनेक कर्मचारी गैरहजर असल्याने, युवासेनेच्या वतीने संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर श्वानाला बसून आंदोलन देखील करण्यात आले.
कृषी अधिकारी कार्यालयात हजर राहत नसल्याचा आरोप
शेतकऱ्यांनी बियाण्यासंदर्भात शेकडो तक्रारी कृषी अधिकारी कार्यालयाकडे केल्या आहेत. मात्र या तक्रारींची दखल कृषी अधिकाऱ्यांकडून घेतली जात नाही, तसेच कृषी अधिकारी हे सतत गैरहजर असतात असा आरोप करण्या येत होता. या पार्श्वभूमीवर आज युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश मारोडकर यांनी शेतकऱ्यांसोबत कृषी अधिकारी कार्यालयाला भेट दिली. मात्र तब्बल एकतासानंतर देखील कोणीच न आल्याने, संतप्त होत युवासेनेच्या वतीने कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर श्वान बसून अनोखे आंदोलन करण्यात आले. तसेच कृषी अधिकारी कार्यालयात हजर नसल्याची तक्रार देखील भ्रमणध्वनीद्वारे जिल्हा कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
हेही वाचा - Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नव्हता.. मुसळधार पावसाने साचले पाणी - महापौर