ETV Bharat / state

संचारबंदीत हजारो मजुरांचा जत्था छत्तीसगडमधून चाळीसगावकडे रवाना, प्रशासनाची डोळेझाक - छत्तीसगड

परतवाडा-अंजनगाव सूर्जी मार्गावर शेकडो ट्रॅक्टरमधून हजारो ऊसतोडणी कामगार छत्तीसगडमधून अंजनगाव सुर्जी मार्गे चाळीसगावकडे रवाना झाले आहेत. मात्र प्रशासनाने याबाबत कोणतीही चौकशी केली नाही.

Sugar Cane Workers
मजुरांचा जत्था
author img

By

Published : Apr 23, 2020, 10:35 AM IST

अमरावती - संचारबंदीत ऊसतोडणीसाठी गेलेले हजारो मजूर छत्तीसगडमधून अंजनगाव सुर्जी मार्गे चाळीसगावकडे रवाना झाले आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाने याबाबत कोणतीही चौकशी न केल्याने जनतेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Sugar Cane Workers
मजूर

याबाबत माहिती अशी, की परतवाडा-अंजनगाव सूर्जी मार्गावर शेकडो ट्रॅक्टरमधून हजारो ऊसतोडणी कामगार भर उन्हात जात होते. याबाबतची माहिती काही नागरिकांना मिळाली. त्यावरून शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या मजुरांना याबाबत माहिती विचारली असता, आम्ही छत्तीसगडमधून चाळीसगावकडे जात असल्याचे त्यांनी सांगितले. एका ट्रॅक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष लहान मुलांचा समावेश होता. संचारबंदीच्या सर्व नियमाची ऐसी-तैसी होत असल्याचे दिसून येत होते. प्रमाणाच्या वर ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या मजुरांना मास्क लावलेले नव्हते.

सामाजिक अंतराच्या नियमाची सर्रास पायमल्ली होत असल्याचे दिसून आले. ते सर्व लोक आमच्याजवळ जाण्याचे परवानगी पत्र असल्याचे सांगत होते. याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनास मोबाईलवरून याबाबतची कल्पना दिली. परंतु स्थानिक प्रशासनाने सदर बाब गांभीर्याने घेतली नसल्याचे समजते. बिनधास्तपणे भरउन्हामध्ये संचारबंदीच्या सर्व नियमांची ऐसी तैसी करून हजारो मजूर ट्रॅक्टरने चाळीसगावकडे रवाना झाले. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.