अमरावती - कोरोनाबाबत काही प्रवृत्ती अफवा पसरवत आहेत. चुकीची माहिती देत आहेत. अशा व्यक्तींवर पोलीस विभागाची करडी नजर आहे. कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अमरावतीचे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी दिला आहे.
अमरावती जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात आढावा घेण्यासाठी आज जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त संजय बाविस्कर म्हणाले, कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासोबतच जे कुणी खोडसाळ संदेश किंवा अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाणार आहे. अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींचे नाव, त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक पोलिसांना कळवावा. आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. तसेच खोडसळ प्रवृत्तीविरुद्ध पोलीस लक्ष ठेवून आहेत. मात्र, नागरिकांनीही अशा प्रवृत्तीविरुद्ध सजग रहावे, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले.
हेही वाचा -
आठवलेंचा नवा नारा... म्हणून जागा झाला देश सारा
Corona Effect VIDEO: संत्र्यांच्या मागणीतील वाढ व्यापाऱ्यांच्या पथ्यावर?