अमरावती - धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भाटकुली परिसरात बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या युवकाला जिल्हाचे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने रंगेहात पकडले. हा युवक चार चाकी वाहनाने अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करत होता. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या ३० पेट्या देशी दारू, ५ लाख रुपये किंमतीची कार आणि दोन मोबाईल असा एकूण अंदाजे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी पवन हिरामण ठाकरे (वय-29 वर्ष रा. धामणगाव रेल्वे) याला अटक करण्यात आली आहे.
धामनगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भाटकुली येथे अवैधरित्या विनापरवाना देशी दारू वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे मध्यरात्री पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपी पवन हिरामण ठाकरे यांच्या कडून १ लाख ०५ हजार रुपये किंमतीच्या ३० पेटी देशी दारू,५ लाख रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर कार व दोन मोबाईल असा एकूण अंदाजे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
देशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यास अटक; तब्बल सहा लाखांचा मुद्देमाल जप्त - amravati police action
एक लाख रुपये किंमतीच्या ३० पेट्या देशी दारू, ५ लाख रुपये किमतीची कार आणि दोन मोबाईल असा एकूण अंदाजे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर या प्रकरणी आरोपी पवन हिरामण ठाकरे (वय-29 वर्ष रा. धामणगाव रेल्वे) याला अटक करण्यात आली आहे.