अमरावती - अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करुन त्या घटनेचा व्हिडिओ बनविण्याची घटना शहरात घडली. ही चित्रफीत मित्रांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने पीडितेचे अनेकदा शोषण केले असल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेच्य तक्रारीवरुन पोलिसांनी त्या नराधम आरोपीला आटक केली आहे. अभिजित महादेव लोणार (वय २१, रा. महादेवखोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अभिजित शाळेत असताना त्याच शाळेत त्याला 3 वर्ष ज्युनियर असणाऱ्या पीडितेला तो त्रास द्यायचा. यावरून त्यांचे शाळेत भांडण व्हायचे. सध्या ती महाविद्यलयात शिक्षण घेत असतानाही आरोपीने तिचा पिच्छा कायम ठेवला. आरोपी फेसबुक, व्हॉट्स अॅपवरून पीडितेला संदेश पाठवून त्रास द्यायचा. हा प्रकार सुरू असतानाच 25 मे 2019 ला आरोपीने पीडित मुलीला जबरदस्तीने यशोदानागर परिसरात त्याच्या मित्राकडे नेले. यावेळी पीडित युवती घरात येताच आरोपीचा मित्र तिला घरात ठेऊन स्वतः घराला बाहेरून कुलूप लावून निघून गेला. मित्राच्या घरात आरोपीने पीडितेवर बलात्कार करून या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला. यानंतर व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देत ओरोपीने पीडितेवर अनेकदा अत्याचार केल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
आरोपीने झाल्या प्रकारचा व्हिडिओ त्याच्या मित्रांमध्ये व्हायरल केला. या चित्रफितीची माहिती पीडितेच्या भावाला कळल्यावर पीडितेसह तिच्या कुटुंबीयांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अभिजित लोणारे विरूद्ध पोस्कोसह आयटी ऍक्ट व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पीडित युवतीचे समुपदेशन पोलीस करत असून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.