ETV Bharat / state

Tiger Census 2022 : संपूर्ण जगात वाघांची संख्या भविष्यात महाराष्ट्रात सर्वाधिक वाढणार; भारतीय वन्यजीव संस्थेचा अहवाल - number of tigers in world

महाराष्ट्रात वाघ किती, हा प्रश्न सर्वांना पडतो. संपूर्ण जगात वाघांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक वाढत आहे. ही संख्या भविष्यात देखील वाढणार आहे, त्यामुळे वाघांसाठी संपूर्ण जगात महाराष्ट्र नंबर वन राहील असा अहवाल नुकताच भारतीय वन्यजीव संस्थेने जाहीर केला आहे. याबाबत या विशेष रिपोर्टमधून अधिक जाणून घेवू या.

Tiger Census 2022
महाराष्ट्रात वाघांची संख्या
author img

By

Published : Apr 20, 2023, 6:56 AM IST

Updated : Apr 20, 2023, 3:57 PM IST

राज्यात वाघांचे प्रमाण हे 23 टक्क्याने वाढत असल्याचे शुभ संकेत- महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य यादव तरटे

अमरावती : महाराष्ट्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार 2022 च्या व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रात जवळपास 446 वाघ आहेत. 2006 मध्ये महाराष्ट्रात वाघांची संख्या ही 103 इतकी होती. 2010 च्या व्याघ्रगणनेनुसार महाराष्ट्रात वाघांची संख्या ही 168 वर पोहोचली. 2014 मध्ये महाराष्ट्रात एकूण 190 वाघ होते. पुढील चार वर्षात वाघांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. 2018 च्या व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रात 312 वाघ होते. वाघांच्या संख्यावाढीचा आलेख पुढील चार वर्षे देखील कायम राहिला. 2022 च्या व्याघ्र गणनेनुसार आज महाराष्ट्रात जवळपास 446 वाघ आहेत. राज्यात वाघांचे प्रमाण हे 23 टक्क्याने वाढत असल्याचे शुभ संकेत आहेत, असे महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.

Tiger Census 2022
महाराष्ट्रात वाघांची संख्या

व्याघ्र संवर्धनासाठी सज्ज होण्याची गरज : आज वाघांच्या बाबतीत जगात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातही महाराष्ट्रात वाघांची संख्या सर्वाधिक असणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. 1900 मध्ये भारतात एकूण 40,000 वाघ होते. 1971 मध्ये दुर्दैवाने भारतात केवळ 1800 वाघ उरले होते. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाघांच्या मोठ्या प्रमाणात खालावलेल्या संख्येची गांभीर्याने दखल घेत भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 हे कलम लागू केले. तसेच 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प योजना जाहीर केली.

व्याघ्र प्रकल्पावर मोठी जबाबदारी : व्याघ्र प्रकल्प योजनेमुळे वाघांसह जंगलातील इतर प्राण्यांचे संरक्षण व्हायला लागले. आता वाघांची संख्या वाढायला लागली असतानाच हे वाघ जंगलाबाहेर जाणार नाही, याबाबत व्याघ्र प्रकल्पावर मोठी जबाबदारी राहणार आहे. वाघ आणि मानवांचा संघर्ष होणार नाही, याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. वाघांची शिकार होणार नाही, याबाबत देखील व्याघ्र प्रकल्पासह वन विभागाला सज्ज राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे देखील यादव तरटे म्हणाले.

वाघांची 70 टक्के संख्या भारतात : 2018 मध्ये संपूर्ण जगात एकूण 3890 वाघ आढळून आले आहेत. 2018 मध्ये भारतात वाघांची संख्या ही 2967 इतकी होती. आज 2023 मध्ये भारतात एकूण 3,167 वाघ आहेत. या 3 हजार 167 वाघांपैकी 446 वाघ हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या ही सर्वाधिक विदर्भात आहे. वाघांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. वाघांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. व्याघ्र प्रकल्प आणि महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास निश्चितपणे यशस्वी ठरेल, असा विश्वास देखील यादव तरटे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : Melghat Tiger: मेळघाटात भर रस्त्यात व्याघ्र दर्शन; नागरिकांत धास्तीचे वातावरण

Last Updated : Apr 20, 2023, 3:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.