अमरावती - शेगावहून संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परत गावी जात असताना भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहावर शेंदोळा खुर्द गाववजवळ भरधाव कारचे पुढचे टायर अचानक फुटल्याने हा प्रकार घडला. घटनेत गाडीतील तीनही भाविक सुखरूप असून एका भाविकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
हेही वाचा - तिवसा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची लटकवली झाडाला
चंद्रपूरच्या वडगाव येथील तीन भाविक काल शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. परत येत असताना, रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान अटायर फुटल्याने ही कार दुभाजकावर चढून पलटी झाली. दरम्यान, कारमधील एअर बॅग उघडल्याने तिनही भाविक थोडक्यात बचावले. असून एक भाविक किरकोळ जखमी झाला आहे.