ETV Bharat / state

जिल्हा परिषद सदस्यासह तिच्या पतीला १० हजार रुपयाची लाच घेताना अटक - लाच

महिला जिल्हा परिषद सदस्या व त्यांचे पती या दाम्पत्याला १० हजार रुपयांची लाच घेताना आज दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

अनिता राजु मेश्राम
author img

By

Published : Apr 24, 2019, 6:18 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील तळेगाव दशासर जिल्हा परिषद सर्कलच्या महिला जिल्हा परिषद सदस्या व त्यांचे पती या दाम्पत्याला १० हजार रुपयांची लाच घेताना आज दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणातील महिला जिल्हा परिषद सदस्या या काँग्रेस पक्षाच्या असून या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषद सदस्यासह तिच्या पतीला १० हजार रुपयाची लाच घेताना अटक

अनिता राजु मेश्राम (वय ४५) त्यांचे पती राजू एकनाथ मेश्राम (वय ५०) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. तक्रारदार यांचा लाकूड तोडून विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्याने तळेगाव दशासर येथील तलावावरील बाभळीच्या झाडे तोडली. याची तक्रार न करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्या अनिता मेश्राम यांनी १५ हजार रुपयांची लाच तक्रारदाराला मागितली. तेव्हा तडजोडीनंतर १० हजार रुपये देण्याचे तक्रारदाराने मान्य केले.

याबाबत तक्रारदाराने अमरावतीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तेव्हा एसीबीने सापळा रचून १० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना दाम्पत्याला पकडले.

Intro:महिला जिल्हा परिषद सदस्यासह पतीला 10 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात अटक.

अमरावतीच्या तळेगाव दशासर येथे लाच लूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

अमरावती अँकर

अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर जिल्हा परिषद सर्कलच्या महिला जिल्हा परिषद सदस्या व त्यांचे पती या दोघा पती पत्नीला १० हजार रुपयांची लाच घेतांना आज दि २४ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केल्याची घटना दुपारी घडली यामुळे जिल्हात खळबळ उडाली आहे .काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्य
सौ.अनिता राजु मेश्राम, वय- 45 वर्ष,, तळेगाव दशासर सर्कल व त्यांचे पती राजू एकनाथ मेश्राम, वय 50 वर्ष या पती पत्नी जोडप्यांना अटक करण्यात आली आहे
तक्रारदार यांचा लाकुड तोडून विक्री करण्याचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी तळेगाव दशासर येथिल तलावाचे भिंतीवरील छाटलेल्या बाभळीच्या झाडामुळे त्यांचे विरूध्द तक्रार न करण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या अनिता मेश्राम यांनी तक्रारदार यांना 15,000/- रू. लाचेची मागणी केली होती तडजोडीअंती 10,000/-रू. लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. मात्र तक्रार दाराने याबाबत सदर तक्रार अमरावतीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती त्यामुळे एसीबीने यशस्वी सापडा रचत कारवाई केली दरम्यान 10,000/- रू लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारून आरोपी राजू मेश्राम ला दिली वरून दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असुन दोघांना अटक करण्यात आले आहे,सदर महिला जिल्हा परिषद सदस्या ह्या काँग्रेस पक्षाच्या असून या कारवाईमुळे जिल्हात चांगलीच खळबळ उडाली आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.