अमरावती: अमरावती शहरापासून साधारणतः 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या भातकुली तालुक्यातील आमला या गावातील विश्वा टोम्पे या तरुणाने आपण नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे व्हावेत, (Agro Machinery In Amravati) हे स्वप्न उराशी बाळगले आणि आपल्या उद्योगाची सुरुवात केली. (Agricultural machinery manufacturing) विश्वा यांनी 2008 मध्ये शीट मेटल वर्कर्स या ट्रेडमध्ये आयटीआय करून 2010 मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात इंटरशिप पूर्ण केली. (Amravati youth ) त्यानंतर 2011 ते 13 या काळात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये (Mahindra And Mahindra Company) नोकरी केली. त्यानंतर पुढे काही काळ टाटा या नामांकित संस्थेमध्ये सुद्धा नोकरी केली आहे.
आई-वडिलांच्या चिंतेने गावात परत: आपण बाहेरगावी गेल्यामुळे आपल्या आई-वडिलांचे पुढे काय होईल ही चिंता मला सतत होती. त्यामुळेच आपण गावात जाऊनच काहीतरी उद्योग व्यवसाय करावा असे ममनोमन वाटत होते . गावात आल्यानंतर सुरुवातीला मोठ्या भावाच्या वेल्डींग व्यवसायात त्याला मदत करू लागलो, आणि पुढे काही दिवसांनी कृषी यंत्राचा व्यवसाय उद्योग आपण सुरू करावा असे मनात आले. मात्र उद्योगासाठी लागणारे पुरेसे भाग भांडवल नसल्यामुळे ते शक्य होत नव्हते. अशातच अमरावतीला खादी ग्रामोद्योग कार्यालय यांच्याशी संपर्क साधला.
यंत्र निर्मिती करण्यास सुरुवात: पीएमईजीपी या योजनेअंतर्गत 12 लाखाच्या कर्जासाठी अर्ज केला आणि 8 लाख 18 हजाराचे कर्ज आमच्या गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया मधून मिळाले. त्यापैकी 4.18 लाख रुपयांच्या मशिनरी घेतल्यात. त्यापैकी 4 लाख रुपयांचे खेळते भाग भांडवल ठेवले. या अर्थसहाय्यामधून ट्रॅक्टरचलीत पेरणी यंत्र, फवारणी यंत्र, पणजी, नांगर, ट्रॉली, बैलजोडी नांगर, पावसाळ्यात ट्रॅक्टर फवारणी यंत्र, खत फेकायचे यंत्र अशा ट्रॅक्टरचलीत आठ ते दहा प्रकारचे तर बैल जोडी वरचे तीन ते चार प्रकारचे यंत्र निर्मिती करण्यास सुरुवात केल्याचे विश्वा यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रभर यंत्राचा होतो पुरवठा: आज मी निर्मिती केलेले कृषी यंत्र चांदूरबाजार, मुर्तीजापुर, दर्यापूर यासह अकोला,खामगाव, बुलढाणा, परभणी तसेच इतर जिल्ह्यातील विक्री जात आहे. जवळपासच्या 30 ते 35 खेड्यांमध्ये कृषी यंत्राचा पुरवठा करत असल्याचे टोम्पे यांनी सांगितले. कृषीसाठी लागणाऱ्या सर्व निर्मितीची सर्व वस्तूंची निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्याचा मोठा भाऊ त्रिशूल टोम्पे यांनी सांगितले आहे. संत शिरोमणी कृषी यंत्र उत्पादन कारखान्यामध्ये पाच कुशल मनुष्यबळ असून ते सर्व आयटीआय उत्तीर्ण आहेत.
मी यांचा आहे ऋणी: उद्योग उभारताना जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे, उद्योग निरीक्षक मंगेश वानखडे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी किशोर कुमार यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे विश्वा टोम्पे यांनी सांगितले आहे.