ETV Bharat / state

मातृभूमीची ओढ; घर गाठण्यासाठी तरुणाचा सातशे किलोमीटर सायकल प्रवास - corona lockdown

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर येथील युवराज शिवाजी सुतार हा वीस वर्षीय युवक फेब्रुवारी महिन्यात काही कामानिमित्त मध्य प्रदेशातील बैतूल येथे आला होता. बैतूल येथून सोलापूरला जाण्यासाठी पायीच निघालेल्या वीस वर्षीय युवकाची व्यथा ऐकून संवेदनशील मनाच्या महाराष्ट्र पोलिसांनी त्या युवकाला सायकल भेट दिली.

मातृभूमीची ओढ ; घर गाठण्यासाठी तरुणाचा सातशे किलोमीटर सायकल प्रवास

author img

By

Published : May 14, 2020, 5:36 PM IST

अमरावती - बैतूल येथून सोलापूरला जाण्यासाठी पायीच निघालेल्या वीस वर्षीय युवकाची व्यथा ऐकून संवेदनशील मनाच्या महाराष्ट्र पोलिसांनी त्या युवकाला सायकलच भेट दिली. सायकल भेटीचा आनंद त्या युवकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. मध्य प्रदेशातील बैतूल येथे कामानिमित्त आलेला सोलापूर येथील एक वीस वर्षीय युवक गेल्या तीन महिन्यांपासून बैतूल येथे अडकल्याने पायीच सोलापूरला जाण्यासाठी निघाला. महाराष्ट्राच्या सीमेवर पोलिसांनी त्याला अडवले व त्याबाबत पूर्ण माहिती जाणून त्याची आपल्या गावी जाण्याची जिद्द पाहून पोलिसांनी त्याची एक दिवस जेवणाची सोय करून त्याला एक सायकल भेट दिली. तब्बल सातशे किलोमीटर असलेल्या सोलापूरला जाण्यासाठी सायकलने निघाला. त्याच्या या जिद्दीने आपल्या मायभूमीची ओढ काय असते, याची प्रचिती प्रत्येकाला येत होती.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर येथील युवराज शिवाजी सुतार हा वीस वर्षीय युवक फेब्रुवारी महिन्यात काही कामानिमित्त मध्य प्रदेशातील बैतूल येथे आला होता. त्याने तेथे राहण्यासाठी एका मित्राच्या घराचा सहारा मिळवला होता. परंतु कोरोना या भयंकर रोगाची साथ संपूर्ण जगासह आपल्या देशातही पसरली व मार्च महिन्यात संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. जो जेथे आहे तेथेच अडकला. त्यात युवराजसुद्धा फसला. तीन महिने होत आहेत मित्राचा परिवार राहण्यास आग्रह करत होता परंतु मित्राच्या घरी राहून किती राहणार. शिवाय सोलापूर येथील आपला परिवार कसा आहे, याची सतत चिंता सतावत होती. मधल्या काळात अनेक लोक पायीच आपल्या गावी जात असल्याचा बातम्या समजल्याने युवराजनेसुद्धा सोलापूरला पायी जाण्याची जिद्द बांधली व तो मित्र परिवाराचा निरोप घेऊन एकटाच सोलापूरला पायी जाण्यासाठी निघाला.

दरम्यान, महाराष्ट्राच्या सीमेवर महाराष्ट्र पोलिसांनी त्याला अडवून त्याची माहिती व परिस्थिती जाणून घेतली. पोलिसांनी त्याला धीर देत जेवण दिले. रात्रभर त्याला ठेवून दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला एक सायकल देत त्याच्या जिद्दीला सलाम करत सोलापूरला जाण्यासाठी निरोप दिला. हा युवक सोमवारी (ता. ११) ला रात्री आठ वाजता अंजनगाव सुर्जीमार्गे अकोटला जात असताना मुख्य रस्त्यावर कंत्राटदार विजय अस्वार, पत्रकार अशोक पिंजरकर, गजानन मंडलिक उपस्थित होते. तेव्हा युवराजने तेथे थांबून पाण्यासाठी हाक दिली. तेव्हा पत्रकारांनी त्याची माहिती जाणून घेतली. व त्याला पाणी देऊन जेवणासाठीसुद्धा आग्रह केला. युवराजशी चर्चा केली असता तब्बल सातशे किलोमीटर सायकलने आपल्या मायभूमीत परिवाराच्या सानिध्यात जाण्याची त्याची जिद्द पाहून सर्वांनी त्याला सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने जाताना सर्वांचे धन्यवाद मानून आपल्याला आस्थेने विचारपूस करून सायकलची मदत करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले. सायकलच्या प्रवासात हा युवक थकला असतानाही महाराष्ट्र पोलिसांनी भेट म्हणून दिलेल्या सायकलीचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.