ETV Bharat / state

अमरावतीत कारगिल दिनी शहिदांना श्रद्धांजली

कारगिल दिनानिमित्त शुक्रवारी अमरावती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने ई-ऑरबीट येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

author img

By

Published : Jul 26, 2019, 12:03 PM IST

शहिदांना श्रद्धांजली

अमरावती- कारगिल दिनानिमित्त शुक्रवारी अमरावती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने ई-ऑरबीट येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच जिल्ह्यातील वीर माता, वीर पत्नी आणि वीर वडिलांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

कारगिल दिनी शहीदांना श्रद्धांजली

या सोहळ्यात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी देशातील नागरिकांनी प्रामाणिक वर्तन ठेवावे. तसेच आपल्या कर्तव्यांचे योग्यपणे पालन करत आपल्या संरक्षणासाठी सीमेवर सज्ज असणाऱ्या सैनिकांप्रति आदर बाळगण्याचे आवाहन केले. फ्लाईट लेफ्टनंट रत्नाकर चरडे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जिल्ह्यातील माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय या सोहळ्याला उपस्थित होते. कारगिल दिनानिमित्त ई-ऑरबीटच्या तिन्ही स्क्रीनवर उरी हा सिनेमा विद्यार्थी आणि आजी-माजी सैनिकांना दाखविण्यात आला.

Intro: कारगिल दिनानिमित्त आज अमरावती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने ई- ऑ ओरबीट येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच जिल्ह्यातील वीर माता, विरपत्नी आणि वीर वडिलांचा जिल्जाधिकार्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थितांनी शाहीदांना श्रद्धांजली वाहिली.

Body:फ्लाईट लेफ्टनंट रत्नाकर चरडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित
या सोहळ्यात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी देशातील नागरिकांनी प्रामाणिक वर्तन ठेऊन आणि आपल्या कर्तव्यांचे योग्यपणे पालनकरन आपल्या संरक्षणासाठी सीमेवर सज्ज असणाऱ्या सैनिकांप्रति खरा आदर बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' असा जयघोष विद्यार्थ्यांनी केला. जिल्ह्यातील माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय या सोहळ्याला उपस्थित होते. कारगिल दिनानिमतत ई-ऑरबीटीच्या तिन्ही स्क्रीनवर उरी हा सिनेमा विद्यार्थी आणि आजी-माजी सैनिकांना दाखविण्यात आला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.