अमरावती - पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला घरात दोरीने बांधून लोखंडी रॉडने हत्या करण्यात आली. अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या महादेव खोरी परिसरात ही घटना उघडकीस आली.
हेही वाचा - रिक्षाचालकासह चौघांची हॉटेलच्या कॅप्टनला मारहाण; ठाण्यातील घटना
प्रमोद नामदेव लोणारे वय 25 असे मृत युवकाचे नाव आहे. प्रमोद लोणारे याचे महादेवखोरी परिसरातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. दरम्यान, प्रमोदचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती अनिल धनद्रव्ये यांना होताच त्यांनी पत्नी दीपा धनद्रवे आणि सहकारी अनिल वरघट यांच्या मदतीने कट रचला. प्रमोद लोणारे हा दीपा धनद्रव्ये यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला असता प्रमोद लोणारेला, दीपा धनद्रव्ये आणि अनिल वरघट यांनी प्रमोद लोणारे याला दोरीने बांधून त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉड ने वार केला. या हल्ल्यात प्रमोद लोणारे जागीच ठार झाला. या घटनेमुळे महादेव कोळी परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस घटनास्थळी पोहोचले मृत प्रमोद लोणारे चे वडील नामदेव लोणारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी अनिल धनद्रव्ये दीपा धनद्रव्ये आणि अनिल वरघट यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
हेही वाचा - पुण्यातील २ भामट्यांनी लॉन व्यवसायिक प्राध्यापकाला घातला ९ लाखांचा गंडा