अमरावती : येथील श्याम कॉटन इंडस्ट्रीजमध्ये सोमवारी नेहमीप्रमाणे मजूर मशीनवर काम करीत असताना, दुपारच्या सुमारास ज्याठिकाणच्या पट्ट्यावरून कापूस आतमध्ये पाठवला जातो त्या ठिकाणी अचानक आग लागली. अगदी काही क्षणातच आगीचे मोठे रुप धारण केले. सर्वांनी धावपळ करत उपस्थित मजुरांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, अंजनगाव व अचलपूर अग्निशामक दलाच्या बंबास पाचारण करण्यात आले होते. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. कापसाच्या गंजीला लागलेल्या आगीत साठ ते सत्तर लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच, आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनास्थळी पथ्रोट पोलीस व महसुल मंडळातील तलाठी यानी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
प्रचंड नुकसान : लागलेल्या आगीत ५० ते ६० लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचा पंचनामा केला असून, तसा अहवाल वरिष्ठाकडे पाठवला असल्याची माहिती पथ्रोटचे प्रभारी तलाठी राजेश्वर वैद्य यांनी दिली आहे. दरम्यान, जळालेल्या कापूस मधून सरकी, रुई खराब निघते, पुन्हा आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर झाल्याने भिजलेला कापूस काळा होतो, त्यामुळे भाव अर्ध्यावरच येतो. उपस्थित मजुरांच्या सहकार्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. अन्यथा मोठी हानी झाली असती, असे शाम कॉटन इंडस्ट्रीजचे संचालक मुरारी अग्रवाल यांनी सांगितले