ETV Bharat / state

94 वर्षाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात - कोरोना न्यूज

हनुमान नगरात राहणाऱ्या ९४ वर्षे वय असलेल्या एका आजोबांना कोरोनाने गाठले खरे, पण कणखर आजोबांनी हिंमत न हारता जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार घेत कोरोनावर मात केली आहे. बरे झाल्यानंतर ते स्वतः चालत रुग्णालयाबाहेर आले.

94 year old man overcomes corona in amravati
94 वर्षाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात
author img

By

Published : Jul 26, 2020, 6:14 PM IST

अमरावती - हनुमान नगरात राहणाऱ्या ९४ वर्षे वय असलेल्या एका आजोबांना कोरोनाने गाठले खरे, पण कणखर आजोबांनी हिंमत न हारता जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार घेत कोरोनावर मात केली आहे. बरे झाल्यानंतर ते स्वतः चालत रुग्णालयाबाहेर आले.

हनुमाननगर येथील रहिवाशी असलेले हे आजोबा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तत्काळ येथील जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. दहा दिवसांच्या उपचारानंतर बरे होऊन ते स्वतःच्या घरी परतले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम,
कोविड रुग्णालयाच्या डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी या सर्वांनी टाळ्या वाजवून या आजोबांचे अभिनंदन केले व त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उपचाराच्या काळात आजोबांनी हिंमत कायम ठेवली. कोरोना योग्य उपचारांनी बरा होतो. त्यामुळे घाबरून जाण्यासारखे काहीही नाही. मास्क वापर, स्वच्छता व सोशल डिस्टन्स या नियमांचे पालन करावे, तसेच कुठलीही लक्षणे आढळताच तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी यावेळी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.