अमरावती - दिवसेंदिवस अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. आज (शुक्रवार) आणखी 3 महिलांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यापैकी एक महिला डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय (पीडिएमएमसी) येथील विलगिकरण कक्षात होती तर एक महिला ही याच ठिकाणी कामगार म्हणून कार्यरत आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 93 वर पोहोचली आहे.
अमरावतीत कोरोनाग्रसंतांची संख्या 93 वर डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात कामगार असणाऱ्या उत्तमनगर परिसरातील 42 वर्षीय महिलेस कोरोना आसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मूळची वरुड येथील रहिवासी असणारी आणि काही दिवसांपासून डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथील विलगिकरण कक्षात दाखल असणाऱ्या 37 वर्षीय महिलेलाही कोरोना असल्याचे समोर आले आहे. या दोघींना कोरोना असल्याचे स्पष्ट होताच डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. आज आणखी एक 60 वर्ष वयाची महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. ती मासानगंज परिसरातील रहिवासी आहे. या तिघींनाही उपचारासाठी कोविड रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अमरावतीत कोरोनाग्रसंतांची संख्या 93 वर