ETV Bharat / state

अमरावतीच्या कृष्णानगर परिसरात एकाच कुटुंबातील 7 जणांना कोरोना - Amravati Corona Positive Family

कृष्णानगर परिसरात दोन दिवसांपूर्वी एका 55 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. त्या व्यक्तीच्या कुटुंबातील 1 वर्षाच्या बालकासह आणखी 6 जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

Amravati Corona Update
अमरावती कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 1, 2020, 3:37 PM IST

अमरावती - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. शहरातील कृष्णानगर परिसरात 1 वर्षाच्या बालकासह एकाच कुटुंबातील 7 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 582 वर पोहोचली आहे.

कृष्णानगर परिसरात एकाच कुटुंबातील 7 जणांना कोरोना

कृष्णानगर परिसरात दोन दिवसांपूर्वी एका 55 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. त्या व्यक्तीच्या कुटुंबातील 1 वर्षाच्या बालकासह आणखी 6 जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

या व्यतिरिक्त सोनल शेगाव नाका परिसरातील सोनल कॉलनीत 55 वर्षाच्या महिलेसह तिच्या 28 वर्षाच्या सुनेलाही कोरोना झाला आहे. यापूर्वी याच कुटुंबातील पुरुषाला कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच सासू आणि सुनेचीही चाचणी घेण्यात आली होती.

जुन्या महामार्गावर विदर्भ प्रिमियम सोसायटी, राजापेठ, बडनेरा जुनी वस्ती, दर्यापूर शहर आणि दर्यापूर तालुक्यातील नांदरूण गावातही कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. अमरावतीत कोरोनाचा कहर वाढत असल्याने प्रशासनाचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.