अमरावती - जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी रात्री एका ५९ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा कोरोनाचा अमरावतीत दुसरा बळी असण्याची शक्यता आहे. स्वॅब चाचणी अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
मृत व्यक्ती हा नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सोफियानगर परिसरातला रहिवासी होता. आजारी असल्यामुळे सोमवारी सकाळी 10 वाजता त्याला मेडलाईफ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीची आधीच बायपास सर्जरी झाली असल्याची माहिती आहे. मिडलाईफ रुग्णालयात डॉक्टरांना त्याच्या एक्स-रे मध्ये संशय वाटल्याने त्याला रात्री 10 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मृत्यूपूर्वी डॉक्टरांनी त्याचा स्वॅबचे नमूने घेतले. रात्री 12 च्या सुमारास हा व्यक्ती दगावल्यावर त्याचा स्वब चाचणीसाठी नागपूरला पाठविण्यात आला. स्वॅब चाचणी अहवाल नेमका काय येतो याची प्रतीक्षा आहे.