ETV Bharat / state

इतिहासात पहिल्यांदा केवळ ५१ गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत साजरी होणार राष्ट्रसंतांची पुण्यतिथी

अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव येत्या ३० ऑक्टोंबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीमध्ये होणार आहे.

amravati
अमरावती
author img

By

Published : Oct 5, 2020, 7:10 PM IST

अमरावती - अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव येत्या ३० ऑक्टोंबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीमध्ये होणार आहे. परंतु, राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी केवळ ५१ गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत हा पुण्यतिथी महोत्सव पार पडणार आहे. तसेच गुरुदेव भक्तांनी त्यांच्या गावातच कोविड नियमांचे पालन करून घरूनच गुरुमाऊलीला श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे गुरुकुंज आश्रम येथील कार्यालयात आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी केले आहे.

प्रकाश वाघ - अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ

राष्ट्रसंताची पुण्यतिथी महोत्सवात विविध गावातून गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते वाजत गाजत पदयात्रा काढून गुरुमाऊलीला अभिवादन करण्यासाठी गुरुकुंज आश्रम येथे येत असतात. मात्र, यावेळी कोरोनाचे सावट असल्यामुळे हा महोत्सव कार्यक्रम केवळ ५१ भाविकांमध्ये करण्याचा निर्णय अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने घेतला आहे. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी आपल्या आपल्या गावातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

विदर्भातील सर्वात मोठा महोत्सव म्हणून या पुण्यतिथी महोत्सवाकडे पाहिले जाते. या पुण्यतिथी महोत्सवाला देशभरातील लाखो गुरुदेव भक्त येथे हजेरी लावत असतात. सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून या महोत्सवाकडे पाहिले जाते. मौन श्रद्धांजलीनंतर येथे सर्व धर्माच्या प्रार्थना केल्या जातात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.