अमरावती - नवाथे परिसरातील एका घरावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी अश्लील चाळे करणाऱ्या चार महिलांसह एक पुरुष आणि एका अल्पवयीन युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
विद्याविहार कॉलनीमधील नागरिकांनी एका महिलेच्या घरात नेहमीच चुकीचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे केल्या होत्या. आज एका गुप्त माहितीवरून पोलिसांनी संबधीत महिलेच्या घरी धाड टाकली. यावेळी पोलिसांना घरात अश्लील चाळे सुरू असल्याचा प्रकार आढळून आला.
याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी ताब्यात घेतलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.