ETV Bharat / state

अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील गोफगव्हाण गावात शून्य टक्के मतदान

अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील गोफ गव्हाण या गावातील ५८० प्रकल्प ग्रस्त गावकऱ्यांनी मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकला.

गोफ गव्हाण गावातील ५८० प्रकल्प ग्रस्त गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार
author img

By

Published : Apr 18, 2019, 6:06 PM IST

अमरावती - आज दुसऱ्या टप्यातील लोकसभा निवडणूक अमरावती लोकसभा मतदार संघात पार पडत आहे. परंतु जिल्ह्यातील पेंढी नदी प्रकल्पग्रस्त असलेल्या भातकुली तालुक्यातील गोफ गव्हाण या गावातील ५८० प्रकल्प ग्रस्त गावकऱ्यांनी मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकला. त्यामुळे या गावकऱ्यांच्या एकतेपुढे निवडणूक विभागालाही दिवसभर शांतच बसावे लागले.

गोफ गव्हाण गावातील ५८० प्रकल्प ग्रस्त गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार

आज अमरावती लोकसभा मतदार संघाची निवडणूक पार पडत आहे. परंतु, या गावातील प्रकल्प ग्रस्तांनी आज या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या गावातील प्रकल्पग्रस्त लोकांच्या यामध्ये जमिनी गेल्या असून लोकांना अतिशय तोकडा मोबदला मिळाला. मागील अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करूनही या प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या नशिबी निराशाच आली. त्यामुळे या गावातील लोकांनी एकजूट होऊन अनेकदा शासनाला निवेदन देऊन पाठपुरावा केला. परंतु यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. तसेच राजकीय नेत्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

त्यानुसार आज गोफगव्हाण या गावात ठिकठिकाणी गावकऱ्यांनी निषेधाचे फलक लावले. गावातील ५८० मतदारांपैकी एकाही गावकऱ्याने मतदान न केल्याने मतदान केंद्र आज ओस पडलेले होते. दरम्यान, आज या गावात ३ वाजेपर्यंत एकही मतदान झाले नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

Intro:अमरावती जिल्ह्यातील एक अस गाव जिथे झालं शून्य टक्के मतदान.

भातकुली तालुक्यातील गोफगव्हाण गावातील 580 मतदारांनी टाकला पूर्ण बहिष्कार
----------------------------------------------
आज दुसऱ्या टप्यातील लोकसभा निवडणूक ही अमरावती लोकसभा मतदार संघात पार पडत आहे .परंतु अमरावती जिल्ह्यातील पेंढी नदी प्रकल्प ग्रस्त असलेल्या भातकुली तालुक्यातील गोफ गव्हाण या गावातील 580 प्रकल्प ग्रस्त गावकऱ्यांनी मतदानावर पूर्ण पणे बहिष्कार टाकला.त्यामुळे या गावकऱ्यांच्या एकते पुढे निवडणूक विभागालाही दिवसभर शांतच बसावं लागलं.
आज अमरावती लोकसभा मतदार संघाची निवडणूक पार पडत आहे.परंतु या गावातील प्रकल्प ग्रस्तांनी आज या मतदानावर बहिष्कार टाकला.या गावतील प्रकल्प ग्रस्त लोकांना अतिशय तोकडा मोबदला मिळाला,प्रकल्प ग्रस्त लोकांच्या यामध्ये जमिनी गेल्या गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा या प्रकल्प ग्रस्त ग्रामस्थांच्या नशिबी निराशाच आल्याने या गावातील लोकांनी एकजूट होऊन अनेकदा शासनाला निवेदन पाठपुरावा केला ,राजकीय नेत्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांचा आहे.त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. आज गोफ गव्हाण या गावात ठीक ठिकाणी गावकऱ्यांनी निषेधाचे फलक लावले .तर आज या गावांतील 580 मतदारांन पैकी एकाही गावकऱ्यांने मतदान न केल्याने मतदान केंद्र हे आज ओस पडलेले होते.आज या गावात 3 वाजेपर्यंत एकही मतदान झाले नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.