अकोला - यूथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया अकोला युनिट व रेडक्रॉस सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज रक्तदान करण्यात आले. डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कोरोना विषाणूच्या काळात रक्तदान करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया अकोला युनिट व रेडक्रॉस सोसायटी ऑफ इंडियाने रक्तदान करण्याचा निर्णय घेतला.
या शिबिरात अॅड. भूषण भागवत, धीरज औतकर, भारतेंदु भाटिया, विजय महाजन, रुपेश हरताळकर, मिलिंद कोवले, मोहन विठलानी, अभिषेक जाधव, समीर होरे यांच्यासह आदींनी रक्तदान करून सक्रिय सहभाग घेतला. शिबिर यशस्वी होण्यासाठी स्वानंद कोंडोलीकर, विजय औतकर, दिलीप घुगे, अकोला युनिटचे चेअरमन शरद भागवत रेडक्राँस सोसायटीचे सचिव प्रभूजितसिंग बछेर, प्रशांत राठी, मोहन काजळे यांनी योगदान दिले.