ETV Bharat / state

लग्नास नकार दिला म्हणून एनसीसी प्रशिक्षकाविरोधात विद्यार्थिनीची तक्रार - akola NCC coach news

रामदास पेठ पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करीत प्रशिक्षक अमित जाधव यास अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

akola police
akola police
author img

By

Published : Aug 6, 2021, 9:00 PM IST

Updated : Aug 6, 2021, 9:10 PM IST

अकोला - एका महाविद्यालयात एनसीसीमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार रामदास पेठ पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करीत प्रशिक्षक अमित जाधव यास अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

चार वर्षांपासून संबंध

शारीरिक आणि बौद्धिक विकास व्हावा म्हणून शाळा, महाविद्यालयात एनएसएस किंवा एनसीसीसारखे विभाग आहेत. या माध्यमातून विद्यार्थी आपली क्षमता ओळखतो. असेच एका महाविद्यालयात चार वर्षांपूर्वी एनसीसीचा प्रशिक्षक अमित जाधव हा इतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रशिक्षित करीत होता. त्यामध्ये त्याचे एका विद्यार्थिनीसोबत सूत जुळले. त्यांची मैत्री चांगली घट्ट झाली. त्यांच्यात प्रेम आणि नंतर लग्नाच्याही चर्चा रंगल्या. याचदरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध ही प्रस्थापित झाले.

दोघांमध्ये वाद

गेल्या चार वर्षांपासून ते परस्पर संमतीने एकमेकांशी संबंध ठेवून आहेत. परंतु, त्याने त्या युवतीला लग्नास नकार दिला आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये खटके उडाले. त्या युवतीने प्रशिक्षक अमित जाधवविरोधात अत्याचाराची तक्रार रामदास पेठ पोलीस ठाण्यात चार ऑगस्ट रोजी दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली असून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पीएसआय भरत निकाळजे करत आहेत.

Last Updated : Aug 6, 2021, 9:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.