ETV Bharat / state

भगवान गौतम बुद्धांची रेखीव रंगोळी काढून तरुणीने साजरी केली बुध्दपौर्णिमा - गौतम बुद्ध जयंती

अकोला शहरातील खडकी येथील एका युवतीने चक्क 12 फूट उंच भगवान गौतम बुद्ध यांची रांगोळी काढून बुध्दपौर्णिमा सण साजरा केला आहे. विशेष म्हणजे, कुठल्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन न करता तिने या सणाचा आनंद लुटला आहे.

buddha-image-through-rangoli-
buddha-image-through-rangoli-
author img

By

Published : May 26, 2021, 7:18 PM IST

अकोला - कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू आहे. यामुळे सण, उत्सव साजरे करताना शासनाने मर्यादा आणल्या आहेत. या मर्यादांच्या अधीन राहून सण साजरे करावे लागत आहेत. परंतु, अशा काळातही आपल्या भावनांना वाट मोकळी करीत साधेपणाने आणि कुठलाही लवाजमा न करता हे उत्सव समाजाच्या लक्षात राहील, अशा प्रकारे साजरे करतात. अशाच प्रकारे शहरातील खडकी येथील एका युवतीने चक्क 12 फूट उंच भगवान गौतम बुद्ध यांची रांगोळी काढून बुध्दपौर्णिमा सण साजरा केला आहे. विशेष म्हणजे, कुठल्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन न करता तिने या सणाचा आनंद लुटला आहे.

भगवान गौतम बुद्धांची रांगोळी

खडकी परिसरात राहणाऱ्या शारदा जाधव यांनी बुद्ध पोर्णिमेचे औचित्त साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान येथील बुद्धविहारात बुध्दापौर्णिमा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडे आपली इच्छा व्यक्त केली. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी त्यांच्या उपक्रमाला मान्यता देत त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या संधीचे सोने करीत शारदा जाधव यांनी बुद्धविहारासमोर बुध्दापौर्णिमेच्या पूर्वसंध्येला भगवान गौतम बुद्ध यांची रांगोळी काढण्यास सुरुवात केली.

buddha-image-through-rangoli-
रांगोळी रेखाटताना शारदा जाधव
त्यांनी दहा फूट रुंद आणि 12 फूट उंच अशी रांगोळी काढली. यासाठी त्यांना जवळपास 20 तास लागले. तसेच दहा किलो रांगोळी ही त्यांना लागली आहे. ही रांगोळी त्यांनी अविरतपणे राबून काढली आहे. त्यांनी अशी रांगोळी पहिल्यांदा काढली असल्याचे त्या म्हणाल्या. सुंदर आणि हुबेहूब अशी गौतम बुद्ध यांची प्रतिकृती त्यांनी आपल्या रांगोळीतून रेखाटली आहे. या रांगोळीने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांची ही कला पाहून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.